महाराष्ट्र

अशोक कांबळे यांच्या सतर्कतेमुळे नानावटी रुग्णालयातील बोगस पदवीधारक डाॅक्टरला अटक

मुंबई: भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांच्या सतर्कतेमुळे नानावटी या प्रथितयश रूग्णालयात सेवा देणा-या डाॅ.अतुल वानखेडे या बोगस ऑर्थोपेडीक पदवीधारक सर्जन डाॅक्टरला वरळी पोलीसांनी अटक करून त्याची रवानगी ऑर्थर कारागृहात केली आहे.

डाॅ अतुल वानखेडे यांच्याकडे २०१० साली भारतातून बंद झालेल्या युनिवर्सिटी ऑफ सेशल्स या विद्यापीठाची केईएम रुग्णालयातून २०११ सालची ऑर्थोपिडीक एम एस ही पदवी आहे.वास्तविक पाहता २०१० साली भारतातून बंद झालेल्या तसेच केईएम रुग्णालय पुणे येथे ही पदवीच अस्तित्वात नसताना अशा प्रकारची पदवी दाखवून डाॅ अतुल वानखेडे यांनी मुंबई तील विविध नामांकित रूग्णालयात सेवा दिली असून सध्या ते नानावटी रूग्णालयात सेवा देत आहेत.सदर बोगस पदवी प्रकरणी मेडिकल कौन्सिल ऑफ महाराष्ट्र या ठिकाणी चौकशी सुरू असल्याचे तसेच कौन्सिल ने त्यांना पदवी धारण करण्यास मनाई केल्याचे अशोक कांबळे यांनी सांगितले.

नानावटी रुग्णालयात मणक्याच्या गॅपवर उपचार करण्यासाठी गेलेल्या अविनाश समींदर या डिलीवरी बाॅयला डाॅ .वानखेडे यांनी चुकीचा सल्ला आणि औषधे दिल्यामुळे त्याचा त्रास आणखीन वाढला आपल्यावर या डाॅक्टरकडून चुकीचे उपचार झाल्याची तक्रार समींदर याने अशोक कांबळे यांच्याकडे करीत न्याय देण्याची विनंती केली असता सबंधित डाॅक्टरविरोधात वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीसांनी डाॅक्टर विरोधातभारतीय न्याय संहिता ( बी एन एस), 2023

316 (2),316,(4),318,234,336 (1),336 (2),336 (3),336 (4)

भारतीय न्याय संहिता ( बी एन एस ), 2023

337,338,339,340 (2),351 (2)

नुसार गुन्हे दाखल करीत त्याला अटक करून त्याची रवानगी ऑर्थर रोड कारागृहात केली आहे.पोलीसांनी केलेल्या कारवाईत नानावटी रुग्णालयातून त्यांना अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे मिळाल्याचे कांबळे यांनी सांगितले.सदर व्यक्तीने चुकीचा पत्ता वापरून अनेक बेकायदेशीर कागदपत्रे मिळवून दिशाभूल केल्याचेही त्यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

9 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago