CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 90?
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिसांनी अवैध दारू विक्रीवर अंकुश आणण्यासाठी सलग चार ठिकाणी धडक कारवाया करत गावठी हातभट्टी दारू व विदेशी दारूचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवायांमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.
पहिली कारवाई मलठण येथे केली असून (दि. २३) एप्रिल रोजी मौजे मलठण परिसरात अवैध दारू विक्रीची माहिती मिळाल्यानंतर शिरूर पोलिसांनी कारवाई करत मका शेताजवळील झाडझुडपात लपवून ठेवलेली दारू पकडली. या प्रकरणी ओम विजय मुरकुटे (वय २३, रा. मलठण) याला अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याच्याकडून १० लिटर गावठी हातभट्टीची दारू, अंदाजे किंमत १००० रुपये इतकी जप्त केली आहे
दुसरी कारवाई बाबुराव नगर, शिरूर येथे केली असून (दि. २५) एप्रिल रोजी पोलिसांनी बाबुराव नगर परिसरात गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकला. शफीकुल अस्बर अली (वय ३५, मूळ बिहार) याच्याकडून २५ लिटर गावठी हातभट्टीची दारू सापडली, ज्याची किंमत अंदाजे २५०० रुपये आहे. त्याच्यावरही संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिसरी कारवाई अण्णापुर येथे केली असून (दि. २६) एप्रिल रोजी अण्णापुर येथे स्वप्निल दिनकर शिंदे (वय ३२, रा. अण्णापुर) याच्या ताब्यातून विविध ब्रँडच्या विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त केलेल्या बाटल्यांची एकूण किंमत सुमारे २६९० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
चौथी कारवाई मांडवगण फराटा येथे केली अजून दि. २६ रोजीच दुसऱ्या कारवाईत मांडवगण फराटा येथील हॉटेल रान जत्रा येथे छापा टाकून प्रदीप कुबेर गिरी (वय ४० रा. मांडवगण) याच्या ताब्यातून देशी आणि विदेशी दारूच्या बाटल्या, एकूण किंमत सुमारे ५११० रुपये, हस्तगत करण्यात आल्या आहेत.
या सर्व कारवाया पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आल्या. सर्व आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे. शिरूर पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तसेच नागरिकांनी अवैध धंद्यांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून शिरूर तालुका दारूमुक्त होण्याच्या दिशेने पुढे जाऊ शकेल.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…