महाराष्ट्र

मुंबई उपनगर जिल्ह्यामधून गणेशोत्सव स्पर्धेत चित्रनगरीचा प्रथम क्रमांक

सांस्कृतिक कार्य मंत्री श्री.आशिष शेलार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

मुंबई: राज्य शासनाने आयोजित केलेल्या यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेमध्ये मुंबई उपनगर जिल्ह्यामधून दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या गणेश उत्सव समितीला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. आशिष शेलार यांच्या हस्ते रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे संपन्न झालेल्या पुरस्कार सोहळ्यात वित्तीय सल्लागार मुख्यलेखा वित्तधिकारी चित्रलेखा खातू-रावराणे आणि चित्रनगरी उत्सव समितीच्या पदाधिकारी यांनी पुरस्कार स्वीकारला.

पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील , सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांनी उत्सव समितीचे अभिनंदन केले. गेल्या ३२ वर्षांपासून दादासाहेब फाळके चित्रनगरीत गणेशोत्सव साजरा केला जात आहे. सांस्कृतिक परंपरा जपणाऱ्या उत्सव समितीने यंदाही मोठ्या थाटामाटात चित्रनगरीच्या राजा’ची प्राणप्रतिष्ठापना केली होती.

त्याचबरोबर यंदाच्या गणेशोत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य व पराक्रमाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील किल्ले व जिंजी किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळात समावेश झाल्याच्या पार्श्वभूमीवर देखावा साकारण्यात आला होता. या देखाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा जीवनपट उलगडण्यात आला होता. या देखाव्याला पहिल्या दिवसापासून भाविकांची पसंती मिळाली होती. यंदा शासनाच्या गणेशोत्सव स्पर्धेत बक्षीस मिळाल्याने उत्सव समितीनेदेखील प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

3 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

23 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

23 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

23 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

23 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

23 तास ago