महाराष्ट्र

विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण केल्यावर सर्वोत्तम करिअर पर्यायांची निवड करा

संभाजीनगर: 12वीचा निकाल लागला आहे आणि आता पुढे काय करायच. हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांच्या मनात असतो. विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या असंख्य वाटा खुल्या आहेत.

पूर्वी विज्ञान म्हणजे डॉक्टर किंवा इंजिनिअर इतकंच मानलं जायचं. पण आता तंत्रज्ञान, संशोधन, पर्यावरण, संरक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अशा अनेक हाय इन्कम क्षेत्रांमध्ये करिअरची दारे उघडली आहेत.

चला जाणून घेऊया काही उत्तम करिअर पर्याय

1) अभियांत्रिकी (Engineering): जर तुम्ही PCM (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) घेतले असेल, तर ही तुमच्यासाठी सर्वोत्तम वाट आहे.

जेईईसारख्या परीक्षांद्वारे IITs, NITs मध्ये प्रवेश घेता येतो.

काही नवे पर्याय

आर्टिफिशियल इंटेलिजेंस

डेटा सायन्स

सायबर सिक्युरिटी

रोबोटिक्स

एरोस्पेस इंजिनिअरिंग

2) फार्मसी आणि बायोटेक्नॉलॉजी

आरोग्यसेवा आणि संशोधन क्षेत्रात करिअर करायचं असेल तर B.Pharm किंवा B.Sc Biotechnology हे उत्तम पर्याय आहेत. औषध कंपन्या, R\&D लॅब, हॉस्पिटल्स याठिकाणी भरपूर संधी आहेत.

3) वैद्यकीय आणि आरोग्य विज्ञान NEET दिल्यानंतर खालील अभ्यासक्रम करता येतात

MBBS

BDS

BAMS

BHMS

BPT

याशिवाय पॅरामेडिकल कोर्सेस

लॅब टेक्नॉलॉजी

रेडिओलॉजी

फिजिओथेरपी

नर्सिंग इत्यादी

4) डेटा सायन्स आणि आई

आजच्या डिजिटल युगात डेटा म्हणजे सोनं आहे. जर तुमचं संगणक व गणितात विशेष लक्ष असेल, तर Machine Learning, Data Science, AI क्षेत्र तुम्हाला आर्थिकदृष्ट्या खूप मोठ्या संधी देऊ शकते.

5) कमर्शियल पायलट आणि एव्हिएशन उंच भरारी मारायचीय का

तर पायलट व्हा. DGCA मान्यताप्राप्त कोर्स करून कमर्शियल पायलट बनू शकता. एअर ट्रॅफिक कंट्रोल, ग्राउंड स्टाफ, फ्लाइट ऑपरेशन्स अशा क्षेत्रांतही करिअर करता येते.

6) पर्यावरण विज्ञान आणि हवामान अभ्यास

शाश्वत विकासासाठी पर्यावरण शास्त्रज्ञ, हवामान तज्ज्ञांची गरज वाढत आहे.

जर तुम्हाला निसर्ग आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी काहीतरी करायचं असेल, तर हे क्षेत्र तुमच्यासाठीच आहे.

महत्वाचे

बारावी नंतर योग्य करिअर पर्याय निवडणं ही तुमच्या आयुष्याची दिशा ठरवणारी पायरी असते.

स्वतःचे आवडते विषय, कौशल्यं आणि ध्येय लक्षात घेऊन निर्णय घ्या.

गरज असल्यास शिक्षक, पालक किंवा करिअर काउन्सिलरचा सल्ला जरूर घ्या

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

21 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

21 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

21 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

21 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

22 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

22 तास ago