महाराष्ट्र

सोमनाथ सुर्यवंशींच्या मृत्यूची उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींकडून न्यायालयीन चौकशी करा

मुंबई: परभणीमध्ये संविधानाची विटंबना केल्यानंतर संतप्त जनता रस्त्यावर उतरून शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना पोलिसांनी लाठीचार्ज केला. कोंबिंग ऑपरेशन करून शेकडो आंबेडकरी जनतेला बेदम मारहाण केली, अनेक निष्पाप नागरिकांना अटक केली. आंबेडकरी विचाराचा तरुण सोमनाथ सुर्यवंशी यालाही अटक करुन कोठडीत मारहाण केली, यातच त्याचा मृत्यू झाला पण सरकारने या प्रकरणी पोलिसांवर कठोर कारवाई केली नाही. सुर्यवंशी मृत्यूची चौकशी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींमार्फत करावी तसेच संबंधित पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे, अशा मागण्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसुचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी केल्या आहेत.

पत्रकार परिषदेत बोलताना सिद्धार्थ हत्तिअंबिरे म्हणाले की, परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची विटंबना करण्यात आली या निषेधार्थ पुकारलेल्या आंदोलनानंतर सोमनाथ सूर्यवंशी या तरुण वकिलाला अटक करण्यात आली पोलिसांच्या कारवाईमुळेच सुर्यवंशी व आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांचा मृत्यू झाला. या घटनेला दोन महिने झाले तरी या दोन्ही कुटुंबांना अजून न्याय मिळालेला नाही. सरकार चौकशीच्या नावाखाली पोलिसांना वाचवत आहे. सरकारने या पोलिसांवर कठोर कारवाई केली पाहिजे, कोंबिंग ऑपरेशन दरम्यान ज्या आंबेडकरी लोकांवर गुन्हे दाखल केले ते तात्काळ रद्द करावे.

सोमनाथ सुर्यवंशी व विजय वाकोडे यांच्या कुटुंबांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी. सुर्यवंशी व वाकोडे यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकार नोकरीत सामावून घ्यावे. संबंधित पोलीसांवर हत्येच्या गुन्ह्यासह ऍट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हे दाखल करा. पोलिस मारहाणीत जखमी झालेल्यांना नुकसानभरपाई द्यावी. राज्य सरकारने तातडीने आंबेडकरी जनतेला न्याय द्यावा अन्यथा ३ मार्च रोजी महाराष्ट्रातील सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, संविधानप्रेमी जनतेच्या वतीने आंदोलन करत मंत्रालयाला घेराव घालू, असा इशारा सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी दिला आहे.  या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते आणि स्लम सेल विभाग मुंबई अध्यक्ष सुरेशचंद्र राजहंस, अनुसूचित जाती विभाग मुंबई अध्यक्ष कचरु यादव, महासाचिब महेंद्र मुणगेकर, रमेश कांबळे, राज वाल्मिकी, व इतर उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर पोलिसांच्या डि बी पथकाची धडाकेबाज कामगिरी; दोन म्हशी, दोन बैल आणि पिकअप वाहन असा ५ लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत पशुधन चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात शिरुर पोलिसांच्या…

4 तास ago

शिरुर शहरात नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना पोलिसांचा दणका; २५७ केसेस, तब्बल ३ लाख ५९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल

शिरुर (तेजस फडके): वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करणे हि प्रत्येक चालकाची जबाबदारी असते. मात्र…

4 तास ago

सावधान, ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, या आजारांचा धोका

पूर्वीच्या काळी लोक अशी कामं करत असत ज्यात शरीराला जास्त मेहनत करावी लागत असे. पण…

12 तास ago

घसा सारखा खवखवतो, सतत घशात इन्फेक्शन? ५ उपाय, आजारी झोपून राहाव लागणार नाही

घसा खराब होणे, सोलवटल्यासारखे वाटणे आणि खाताना त्रास होणे हे अनेकदा बदलत्या हवामानामुळे, गरम-थंड पदार्थ…

12 तास ago

हृदयविकार काही घरगुती उपाय

आहार: सकाळचा नाश्ता: फळे, भाज्या, कडधान्ये आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करा. मीठाचे…

12 तास ago

‘लेबल खोटं बोललं तरी ग्राहकाला किंमत मोजावी लागते’; तुकाराम मुंढेंचा भेसळखोरांना सज्जड इशारा

मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाच्या (FDA) धडाकेबाज कारवाईमुळे राज्यातील भेसळखोर आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या…

12 तास ago