महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानावरून काँग्रेस आक्रमक

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली आहे.

सपकाळ यांनी आरोप केला की, धिरेंद्र शास्त्री यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेले वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह असून, त्या वेळी उपस्थित असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. या पार्श्वभूमीवर संबंधित सर्वांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.

टिळक भवन येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, शिवाजी महाराज हे देशाचे प्रेरणास्थान असून त्यांच्या विचारांवर संविधानाची पायाभरणी झालेली आहे. मात्र, काही लोकांकडून त्यांच्या इतिहासाची “विकृत मांडणी” केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.यावेळी त्यांनी असा दावाही केला की, काही भाजप नेते व विचारवंतांकडून पूर्वीही शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधाने झाली आहेत, मात्र त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे चुकीचा संदेश जात असल्याची टीका त्यांनी केली.

तसेच, शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्या संदर्भाबाबतही सपकाळ यांनी भूमिका मांडत, दोघांचा कालखंड वेगळा असल्याचा दावा करत इतिहासाची तोडफोड होत असल्याचे म्हटले.दरम्यान, या प्रकरणामुळे राज्यभरात प्रतिक्रिया उमटत असून, शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी विविध स्तरांतून होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू; एक जखमी…

मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…

3 तास ago

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

10 तास ago

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी; आणखी दोन महिने वाढवा

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…

10 तास ago

Video: शिरूर तालुक्यात गोळीबार, डोक्यात गोळी लागल्याने एकाचा मृत्यू; गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…

1 दिवस ago

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

2 दिवस ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

2 दिवस ago