मनोरंजन

गोंधळ’ चित्रपटाचा प्रयोग हाऊसफुल

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत शुक्रवारी २४ एप्रिल २०२६ रोजी ‘गोंधळ’ या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन पार पडले. या चित्रपटाच्या प्रयोगाला रसिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनावेळी महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर उपस्थित होते. तसेच

चित्रपटाचे निर्माते – दिग्दर्शक संतोष डावखर, क्रिएटीव्ह प्रोड्युसर राम बेंदिरकर, चीफ असिस्टंट डिरेक्टर संकेत सावंत आणि कलाकारांपैकी किशोर कदम, ईशिता देशमुख, अनुज प्रभू उपस्थित होते.

राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार आणि महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रम राबविण्यात येत आहे. सप्टेंबर २०२५ पासून या उपक्रमांतर्गत दर महिन्याला एक चित्रपट दाखवण्यात येत असून रसिकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर श्री.साजणीकर यांनी चित्रपटाच्या टीमशी दिलखुलास संवाद साधला. टीमनेदेखील चित्रपटाच्या निर्मितीप्रक्रियेवेळी घडलेले विविध घटना, आठवणी प्रेक्षकांना सांगितल्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

14 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

14 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

14 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

14 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

14 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

18 तास ago