महाराष्ट्र

माजी आमदार सुभाष चव्हाणांच्या निधनाने काँग्रेसचा समर्पित कार्यकर्ता हरपला

मुंबई: काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार सुभाष चव्हाण यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद व वेदनादायी आहे. सुभाष चव्हाण यांनी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेस विचार सोडला नाही, त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाचा एक समर्पित कार्यकर्ता हरपला आहे, अशी भावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली आहे.

आपल्या शोकसंदेशात काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणतात की, सुभाष चव्हाण यांनी काँग्रेसचा विचार रुजवण्याचे महत्वाचे काम केले. प्रदेश काँग्रेसचे सचिव, सरचिटणीस, उपाध्यक्ष व विधान परिषद सदस्य अशा विविध पदावर त्यांनी काम केले. पक्षाने त्यांना दिलेल्या जबाबदारीला न्याय देण्याचे काम त्यांनी केले. सुभाष चव्हाण यांचा जन्म सिंधुदुर्ग, तालुका मालवण मधील धामापूर या गावचा.

धामापूर गावचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. मागील काही दिवसापासून त्यांची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाने एक निष्ठवान कार्यकर्ता गमावला आहे. सुभाष चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चव्हाण कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

54 मिनिटे ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago