Categories: क्राईम

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचा प्रेमविवाह अन्…

पुणे: पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकामध्ये एका युवतीवर (वय २६) बलात्कार झाल्याची घटना बुधवार (ता. २५) उघडकीस आली आहे. संशयित आरोपी दत्तात्रय रामदास गाडे हा सराईत गुन्हेगार असून तो शिरूर तालुक्यातील गुनाट गावचा रहिवासी आहे. शिक्रापूर आणि शिरुर पोलिस ठाण्यात आरोपीवर गुन्ह्याची नोंद आहे. पोलिसांकडून आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध घेतला जात आहे. आरोपी दत्तात्रय गाडेबद्दल अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. आरोपीचे राजकीय नेत्यांसोबत संबंध असल्याचे समोर आले असून, त्याचा प्रेमविवाह झालेला आहे.

आरोपी दत्तात्रय गाडे याचे एक एक कांड उघडकीस येत आहेत. आरोपीवर यापूर्वी दरोडा, लूटमार आणि फसवणूकीचे सहा गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याला तुरुंगवासही झाला होता. आता अत्याचाराच्या घटनेनंतर आणखी एका गुन्ह्याची भर पडली आहे.

आरोपीचा प्रेमविवाह झाला असून, त्याला एक मुलगा आहे. प्रेमविवाहानंतरही आरोपीची इतर युवती आणि महिलांवर वाईट नजर असल्याची माहिती समोर येत आहे. याच विकृतीतून त्याने स्वारगेट बसस्थानकात युवतीवर अत्याचार केल्याची माहिती समोर येत आहे. आरोपीचा प्रेमविवाह झालेला असला तरी तो घरी फारसा राहत नव्हता. तो सातत्याने फिरतीवर असायचा. ओला-उबर कॅब चालवून तो पैसे कमवायचा. एसटी स्टँडवर मुक्काम करायचा. मंगळवारी पहाटे एकट्या युवतीला पाहून आरोपीची विकृती बाहेर आली आणि त्याने युवतीवर दोन वेळा बलात्कार केला आहे.

पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी १३ पथकं तैनात केली आहे. तसेच आरोपीला वॉन्टेड घोषित करण्यात आले आहे. फरार आरोपीबाबत माहिती देणाऱ्याला एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा पोलिसांकडून केली आहे. माहिती देणाऱ्याचं नाव गुप्त ठेवलं जाईल, असेही पुणे पोलिसांकडून जाहीर करण्यात आले आहे.

दरम्यान, आरोपी दत्तात्रय गाडे हा एक सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर शिरूर, शिक्रापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात जबरी लुटीचे सहा गुन्हे दाखल आहेत. आरोपी गाडे याने २०१९ साली कर्ज काढून एक कार घेतली होती. या कारद्वारे तो पुणे अहिल्यानगर अशी प्रवासी वाहतूक करत होता. दरम्यान, तो एकट्या दुकट्या वृद्ध महिलांना टार्गेट करायचा. त्यांच्या गळ्यात सोनं दिसले तर तो घरून डब्बा घ्यायचा आहे, असे सांगून निर्मनुष्य ठिकाणी गाडी घेऊन जायचा. या ठिकाणी जीवे मारण्याची धमकी देत महिलांच्या गळ्यातील सोनं काढून घ्यायचा.

याप्रकरणी पुणे गुन्हे शाखेने आरोपी गाडेला अटकही केली होती. त्यावेळी त्याच्याकडून १२ तोळे सोनं जप्त केले होते. २०२० मध्ये शिरूरजवळील कर्डे घाटात जबरी लूटमार केली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. त्याला चार ते पाच महिन्यांचा तुरुंगवासही झाला होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो मोकाटपणे फिरत होता. आरोपी दत्ता गाडे याच्या व्हॉट्सअप डीपीवर आमदाराचा फोटो आहे. शिरूरचे आमदार माऊली कटके यांचा फोटो असल्याचे समोर आले आहे. आरोपी दत्ता गाडे हा गावातील लोकांना उज्जैन येथे महाकाल येथे दर्शनाला घेऊन जायचा. आमदाराचा कार्यकर्ता म्हणून गावात मिरवायचा अशी माहिती समोर आली आहे.

शिरुर तालुक्यातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या बाबत धक्कादायक माहिती समोर…

स्वारगेट बलात्कार प्रकरण! शिरूर तालुक्यातील आरोपीचे आरोपीचे राजकीय नेत्यांसोबत संबंध…

पुणे शहरातील स्वारगेट डेपोत युवतीवर बलात्कार आरोपी शिरूर तालुक्यातला…

महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेत हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबित करा…

पुण्यातील बलात्काराच्या घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली…

शिरूर तालुक्यात मिस्त्रीचे काम करण्यासाठी आलेल्या व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार…

शिरूर तालुक्यात अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार…

धक्कादायक! शिरूर तालुक्यात अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार…

शिरुर मध्ये नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मुलीवर वारंवार बलात्कार

शिरुर तालुक्यात अल्पवयीन युवतीला लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

9 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

9 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

9 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

9 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

9 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

9 तास ago