मुख्य बातम्या

केंदूरमध्ये पानातून दिली जाणारी संशयित अपायकारक पावडर जप्त; एकाला अटक

पाबळ (सुनील जिते): पानामध्ये मिसळून व्यसनासाठी वापरली जाणारी संशयित अपायकारक पावडर जप्त करत शिक्रापूर पोलिसांनी केंदूर (ता. शिरूर) येथील पऱ्हाडमळा परिसरात धडक कारवाई केली. या प्रकरणी तुषार राहुल पऱ्हाड (वय २६, रा. पऱ्हाडमळा, केंदूर) याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक अंकुश कारंडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने छापा टाकला. आरोपीच्या घरामागील पत्राशेडमध्ये ठेवलेल्या बॉक्समधून प्लास्टिकच्या पिशवीत साठवून ठेवलेली उग्र वासाची संशयित पावडर आढळून आली. ही पावडर पानामध्ये मिसळून व्यसनासाठी वापरली जात असल्याचा प्राथमिक संशय आहे.

फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या उपस्थितीत पंचनामा करून पावडरचे दोन नमुने रासायनिक विश्लेषणासाठी सीलबंद करण्यात आले. उर्वरित सुमारे ८५ ग्रॅम पावडर जप्त करण्यात आली. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून जप्त केलेला माल तपासासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे.आरोपीला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, शिरूर यांच्या न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास शिक्रापूर पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक अंकुश कारंडे, सोमनाथ कचरे, धनंजय थेऊरकर व विशाल देशमुख यांनी केली.

अवैध व्यसनाविरोधात कठोर कारवाई

“खायच्या पानामधून व्यसनास प्रवृत्त करणाऱ्या आणि मानवी आरोग्याशी खेळ करणाऱ्या अवैध प्रकारांवर तातडीने कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी अशा प्रकारांची माहिती पोलिसांना निर्भयपणे द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल.”

चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक, शिक्रापूर पोलीस ठाणे

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर तालुक्यात विज वाहक तार तुटून शॉर्टसर्किट झाल्याने सुमारे दहा एकर ऊस जळून खाक…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : सध्या दुष्काळाने शेतकरी आधीच होरपळत असताना शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका…

8 तास ago

शिरुर तालुक्यात ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला; पोस्टाच्या १५ लाख ४४ हजार रुपयांच्या अपहाराने खळबळ

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिक आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून थोडी थोडी रक्कम साठवून ती सुरक्षित राहावी…

22 तास ago

वय वाढल्यामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो असा परिणाम

आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…

2 दिवस ago

हृदयासाठीही फायदेशीर आहे आवळ्याचं ज्यूस!

आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…

2 दिवस ago

बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; एकनाथ शिंदेंचा निर्धार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago

ओबीसींच्या स्वतंत्र जनगणना कॉलमसाठी वडेट्टीवारांचा एल्गार! २ नोव्हेंबरला भारत बंद, १५ नोव्हेंबरला दिल्लीत शक्तिप्रदर्शन

नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…

2 दिवस ago