महाराष्ट्र

दाफाचि मुंबई २१ : ‘चित्रपट अभिनय अभ्यासक्रम’ कार्यशाळा उत्साहात संपन्न

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि एफटीआयआय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली ‘चित्रपट अभिनय अभ्यासक्रम’ ही दहा दिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. १० फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना अभिनयाच्या विविध पैलूंवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यशाळेत अभिनेते डॉ. मिलिंद शिंदे यांनी विद्यार्थ्यांना ‘अभिनय म्हणजे नेमके काय?’, संहिता लेखन, संवाद कौशल्य, तसेच लघुपट निर्मितीची प्रक्रिया याविषयी मार्गदर्शन केले. नाटक, सिनेमा आणि मालिकेची संहिता हातात आल्यानंतर तिचा अभ्यास कसा करावा, पात्र समजून घेण्याची पद्धत काय असावी, यावर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

विद्यार्थ्यांनी गटागटाने संकल्पना मांडत संहिता लेखनाचा प्रत्यक्ष सराव केला. त्यापैकी ‘ती स्टेशनवर का नाचली’ या संहितेवर आधारित अभिनय आणि चित्रीकरणाचा सराव घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे चित्रीकरण करून त्याचा लघुपट तयार करण्यात आला. हा लघुपट पाहिल्यानंतर डॉ. शिंदे यांनी विद्यार्थ्यांसोबत चर्चा करत त्यातील उणिवा, आवश्यक बदल आणि सादरीकरण अधिक प्रभावी करण्याचे मार्गदर्शन केले.

हिंदी व मराठी भाषेतील उतारे विविध भावनांमध्ये कसे सादर करावेत, याचेही प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना देण्यात आले. या दहा दिवसांत सैद्धांतिक ज्ञानासोबतच प्रात्यक्षिकांवर भर देत विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यात आला.

सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण

कार्यशाळेचा समारोप महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांच्या उपस्थितीत झाला. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अनुभवांविषयी जाणून घेतले. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून संयोगिता चौहान आणि बहार सूर्यवंशी यांनी कार्यशाळेबाबत आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. अभिनयसृष्टीत करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही कार्यशाळा मार्गदर्शक ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मालवणीत दहीहंडी उत्सवाला गालबोट; ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई:💞 मालवणी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. हंडी फोडताना विटांचा…

15 मिनिटे ago

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

14 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

15 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

15 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

15 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

15 तास ago