मुंबई: वसंत स्मृती येथील भाजप कार्यालयासमोर आज मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत भाजपविरोधात निषेध व्यक्त केला.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयासमोर प्रतीकात्मक फुलांचा वर्षाव करून निषेध नोंदवला. “द्वेष आणि हिंसेच्या राजकारणाला महाराष्ट्रात स्थान नाही,” असा संदेश देण्यात आल्याचे शबरीन यांनी सांगितले.
सायंकाळच्या सुमारास आंदोलनाची हाक देण्यात आल्याने परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांची अडवणूक झुगारून कार्यकर्ते कार्यालयासमोर पोहोचले आणि घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन भोईवाडा पोलीस स्थानक येथे नेले.
यावेळी बोलताना झीनत शबरीन म्हणाल्या की, लोकशाहीत वैचारिक मतभेद असू शकतात; मात्र हिंसेच्या धमक्या देणे हे लोकशाही मूल्यांवर आघात आहे. संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. युवक काँग्रेस लोकशाही आणि संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी सातत्याने लढा देत राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच पोलिसांकडून भाजप कार्यकर्त्यांना मोकळीक दिली जाते, मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांवर दडपशाही केली जाते, असा आरोपही शबरीन यांनी केला. राहुल गांधींना धमक्या देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…