महाराष्ट्र

सामान्य जनतेपर्यंत वेळेत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवा

पुणे: मॉडेल कॉलनी,पुणे या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय,तहसीलदार कार्यालय व शासनाचे इतर विभाग तसेच महानगरपालिका यांचे समन्वयाने आयोजित शासन आपले दारी या कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणुन बोलताना पुढे त्या म्हणाल्या की सर्वसामान्यांसाठी काम करणारा नेता म्हणुन मा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जनमानसात लोकप्रिय आहेत.त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात उपस्थित जनतेचे प्रश्न संबंधित विभागांनी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मार्गी लावावेत.यावेळी सामाजिक अर्थसहाय्य योजनेचे लाभार्थ्यांना लाभाचे आदेश वाटप,विविध दाखले वाटप,क्षयरोग पीडितांना कीट वाटप,पिंक रिक्षा लाभार्थ्यांना रिक्षा वाटप,मतदार ओळखपत्र वाटप,इत्यादी लाभ वाटप करण्यात आले.

विविध विभागांच्या सुमारे २० स्टॉल मार्फत दिवसभर जनतेकडून माहिती देऊन अर्ज भरून घेण्यात आले.या शिबिरामध्ये सुमारे १५० पेक्षा अधिक लोकांना प्रत्यक्ष लाभ देण्यात आला व एक ते दीड हजार नागरिकांनी भेट देऊन विविध योजनांची माहिती घेतली व अर्ज दाखल केले.या कार्यक्रमासाठी श्री धनंजय जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.तसेच तहसिलदार पुणे शहर श्री सुर्यकांत येवले ,पुणे शहर उपायुक्त श्री संकपाळ,निवडणूक नायब तहसीलदार सायली धस,आरोग्य विभाग पर्यवेक्षक श्री प्रशांत कुलकर्णी,समाज कल्याण अधिकारी रामदास चव्हाण,परिमंडळ अधिकारी श्री ओव्हाळ यांच्यासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी यात सहभाग सी नोंदवला.या कार्यक्रमास पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्यासह , उपशहर प्रमुख संजय डोंगरे, संजय तुरेकर, अक्षदा धुमाळ,पुणे शहर समन्वयक संजय जाधव यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांकडून अर्ज मागविले

२५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन मुंबई : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांच्या…

47 मिनिटे ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा; एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत शिवसेनेने यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा बळीराजाला समर्पित…

51 मिनिटे ago

५ हजारांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी गोड होणार?; हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारवर घणाघात

हेक्टरी १ लाख रुपये मदत आणि संपूर्ण कर्जमाफी द्या; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सपकाळांनी मांडली…

56 मिनिटे ago

शाळा प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी

मुंबई: राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. नव्या…

4 तास ago

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

13 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

13 तास ago