महाराष्ट्र

गंभीर दुर्घटना टाळण्यासाठी तातडीची प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी

मुंबई: मुंबईतील नाइट क्लब आणि मनोरंजन स्थळांमध्ये अग्निसुरक्षेची पर्वा न केल्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर धोक्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे मुख्य अग्निशामक अधिकाऱ्यांना निवेदन सादर

गोवा राज्यातील नाइट क्लबमध्ये अलीकडेच घडलेल्या भीषण आगीत २५ निरपराध नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटनेनंतर, मुंबईत अशाप्रकारची दुर्घटना टाळण्यासाठी तातडीची प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष ॲड अमोल मातेले यांनी केली आहे.

आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते व युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले, जिल्हाध्यक्ष संतोष पवार, तालुकाध्यक्ष सुयोग भुजबळ, मुंबई सचिव ब्लेस डिसोजा आणि कलिना तालुका उपाध्यक्ष सतीश पवार यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका कार्यालयात जाऊन मुख्य अग्निशामक अधिकारी श्री. रविंद्र आंबोलकर यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनातील प्रमुख मागण्या मुंबईतील नाइट क्लब्सवर तात्काळ धाडी व Surprise Fire Safety Inspection

मुंबईतील खालील प्रमुख नाइट क्लब/मनोरंजनस्थळांमध्ये तातडीने अग्निसुरक्षा तपासणी करण्याची मागणी करण्यात आली. सर्व गर्दीची ठिकाणी अग्निसुरक्षेची स्थिती तात्काळ तपासणे आवश्यक आहे.

Fire NOC, सुरक्षा यंत्रणा व आपत्कालीन उपाययोजना यांची कायदेशीर पडताळणी

निवेदनात खालील मुद्द्यांची तातडीने तपासणी करण्याची विनंती करण्यात आली.वैध Fire NOC आणि त्याचे नूतनीकरण

फायर अलार्म, हायड्रंट, स्प्रिंकलर, स्मोक डिटेक्टरची कार्यस्थिती

आपत्कालीन एक्झिट्स, वायुवीजन व्यवस्थाप्राणवायू मार्गांवर अडथळे नसावेत

फायर ड्रिलचे प्रमाणपत्र आणि अंमलबजावणी

नियमांचे उल्लंघन झाल्यास शून्य-सहनशीलता धोरण लागू करावे अग्निसुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर खालील कारवाई करावी .तत्काळ परवाना रद्द आस्थापना सील करणे,आर्थिक दंड व गुन्हे नोंद

बेकायदेशीर बदल आढळल्यास तातडीची पावले.

BMC – अग्निशमन दल – पोलीस यांच्या संयुक्त पथकाची मागणी साप्ताहिक धाडी, रात्रीच्या वेळी तपासणी आणि व्हिडिओग्राफिक पुराव्यासह अहवाल सादर करण्यासाठी संयुक्त टास्क फोर्स स्थापन करण्याची मागणी करण्यात आली. नागरिक व कर्मचाऱ्यांसाठी अग्निसुरक्षा प्रशिक्षण अनिवार्य करावे

नाइट क्लब्स व मनोरंजनस्थळांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

नियमित Mock Drills

अग्निसुरक्षा जागरूकता कार्यक्रम यांचे पालन बंधनकारक करण्यात यावे, असे निवेदनात नमूद करण्यात आले. घटना ही मोठा धडा नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे.

निवेदनात हे स्पष्ट करण्यात आले की “प्रॉफिट ओव्हर सेफ्टी” ही प्रवृत्ती प्राणघातक ठरते. मुंबई महानगरपालिका, अग्निशमन दल आणि संबंधित विभागांनी तातडीने कारवाई करून शहरातील नागरिकांचे जीवित संरक्षण सुनिश्चित करणे ही अत्यंत महत्वाची जबाबदारी आहे.

प्रतिनिधी शिष्टमंडळाची भूमिका

निवेदन करताना ॲड. अमोल मातेले यांनी सांगितले “गोवा येथील दुर्घटना ही प्रशासन व आस्थापना मालकांसाठी मोठा इशारा आहे. मुंबईत अशा घटना होऊ नयेत म्हणून तातडीची, निर्णायक आणि कठोर कारवाई अत्यावश्यक आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ग्रामीण-शहरी वाद नव्हे, तरुणाईच्या एकतेतूनच घडेल सक्षम महाराष्ट्र; दिनेश शिंदे

मुंबई: राज्यातील स्पर्धा परीक्षांबाबत ग्रामीण आणि शहरी तरुणाईमध्ये तुलना करण्याऐवजी त्यांच्या सामर्थ्यांचा संगम घडवून महाराष्ट्राच्या…

6 मिनिटे ago

कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला; बिगर-काश्मिरी मजुरावर गोळीबार, एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

सुरक्षा दलांचे मोठे सर्च ऑपरेशन सुरू; हल्लेखोरांचा शोध सुरू जम्मू काश्मीर: जम्मू-काश्मीरमधील दक्षिण काश्मीरच्या कुलगाम…

22 मिनिटे ago

सिंहस्थातून घडणार पुढील १०० वर्षांचा नाशिक; ३२ हजार कोटींच्या विकास आराखड्याची शिंदेंची घोषणा

स्वतंत्र प्राधिकरण, स्वतंत्र कायदा, २०२७ सिंहस्थासाठी अत्याधुनिक नियोजन; १२ कोटी भाविकांच्या व्यवस्थापनाची तयारी मुंबई: सिंहस्थ कुंभमेळा…

25 मिनिटे ago

जनतेच्या विश्वासाचा सन्मान करत महायुती सरकार स्थापन; विकासालाच प्राधान्य; दिनेश शिंदे

२०१९ च्या जनादेशाचा सन्मान, २०२२ मधील राजकीय बदल आणि विकासाभिमुख प्रशासनावर भर मुंबई: २०१९ च्या विधानसभा…

36 मिनिटे ago

अण्णाभाऊ साठे जयंतीकडे सांस्कृतिक विभागाची पाठ?; विशेष कार्यक्रम नसल्याने कलाक्षेत्रात नाराजी

मुंबई: संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून बळ देणारे, वंचित-शोषितांच्या वेदनांना शब्द देणारे लोकशाहिर तथा…

41 मिनिटे ago

लोकमान्यांनी दिला स्वराज्याचा मंत्र, मोदी-शहा भारताला देत आहेत सुरक्षेचा मंत्र; एकनाथ शिंदे

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने अजित डोवाल यांचा गौरव; राष्ट्रसुरक्षा, निर्णायक नेतृत्व आणि गुप्तचर व्यवस्थेचे शिंदेंकडून…

44 मिनिटे ago