महाराष्ट्र

वैभवी देशमुख हिच्या बारावी परीक्षेतील यशाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

मुंबई: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हीने अत्यंत कठीण, आव्हानात्मक परिस्थितीला सामोरं जात इयत्ता बारावी परीक्षेत विज्ञान शाखेतून 85.33 टक्के गूण मिळविल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिचे अभिनंदन केले आहे. वैभवीनं मिळविलेल्या यशानं तिच्या अंगभूत गुणांचं, हुशारीचं, धैर्याचं, संयमाचं, जबाबदारीच्या जाणीवेचं दर्शन घडल्याचं सांगून तिच्या यशानं महाराष्ट्राला आनंद झाला आहे, अशा शब्दात त्यांनी तिचं कौतुक केलं आहे.

वैभवी देशमुख हिला पाठविलेल्या अभिनंदनपर पत्रात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे की, “इयत्ता बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेत विज्ञान शाखेत 85.33 टक्के गूण मिळवून तू उत्तीर्ण झाल्याचे समजून माझ्यासह संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झाला आहे. वडील स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मृत्यूनंतर अत्यंत दु:खद, आव्हानात्मक परिस्थितीला सामोरं जात मिळवलेलं यश तूझ्या अंगभूत गुणांचं, हुशारीचं, धैर्याचं, संयमाचं, जबाबदारीच्या जाणीवेचं दर्शन घडवणारं आहे. तूझ्या यशातून राज्यातील इतर विद्यार्थ्यांना लढण्याची, यशस्वी होण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास आहे. तूझ्या यशानं वडील स्वर्गीय संतोष देशमुख यांना खुप आनंद झाला असता, ते आज आपल्यासोबत नसले तरी तितकाच आनंद महाराष्ट्र आज अनुभवत आहे. तुझ्या कष्टांना, जिद्दीला सलाम. यापुढेही शैक्षणिक कारकिर्दीत, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर तूला असंच यश मिळत राहो, आम्ही सर्व कायमच तूझ्यासोबत आहोत,” असा विश्वास देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगाव महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…

10 तास ago

अहिल्यानगर हादरले! चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या; एफडीएच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

10 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल; युवक संघटनेत शहरी-ग्रामीण अध्यक्षपदांची नवी रचना

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…

14 तास ago

‘दयाबेन’च्या पुनरागमनाची पुन्हा चर्चा; 18 वर्षे पूर्ण होताच भावूक झाले जेठालाल आणि पोपटलाल

दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…

14 तास ago

ऑगस्ट महिन्याची सुरुवात संकष्टी चतुर्थीने; श्रावणात सण-उत्सवांची रेलचेल, जाणून घ्या संपूर्ण यादी

ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…

15 तास ago

‘तारिणी’मध्ये मोठा ट्विस्ट! युवराजसमोर येणार गुलाबचा बॉस; डॉक्टर कामतवर संशय गडद

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…

15 तास ago