महाराष्ट्र

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या मराठी बांधवांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला पुढाकार

मराठी पर्यटकांशी फोनवरून संवाद साधत साधून त्यांना शक्य ती सारी मदत पोहचवण्याची ग्वाही

मुंबई: उत्तराखंडमध्ये अडकलेल्या मराठी पर्यटकांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मदतीचा हात पुढे केला आहे. उत्तराखंडमध्ये दरड कोसळून रस्ते बंद झाल्याने तिथे अडकून पडलेल्या मराठी पर्यटकांपर्यंत मदत पोहचवण्याची विनंती त्यांनी उत्तराखंड सरकारकडे केली आहे.

देवभूमी उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. याठिकाणी ढगफुटी अदृश्य पाऊस पडल्याने नद्यांना प्रचंड पूर आला असून दरडी कोसळून वाहतुकीचे रस्ते बंद झाले आहेत. अशात उत्तराखंडमधील यमुनोत्री धामच्या जानकीचट्टी गावात २८ जूनपासून सुमारे १५० मराठी पर्यटक अडकून पडले आहेत. त्यांच्या परतीच्या मार्गावर दरड कोसळून रस्ते वाहून गेल्याने परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी अजून आठ दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला मदत करावी अशी मागणी मराठी पर्यटकांनी सरकारकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनातील आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत उत्तराखंड येथे अडकलेल्या आकाश जाधव या पर्यटकासोबत फोनवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांची विचारपूस करून शक्य ती मदत त्यांच्यापर्यंत नक्की पोहचवली जाईल असे सांगून त्यांना धीर दिला. तसेच कोणतीही मदत लागल्यास आपल्याला संपर्क करावा असेही सांगितले.

यासोबतच उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्या मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत असलेल्या पराग दकाते यांच्याशी फोनवरून संवाद साधून या पर्यटकांना अन्न धान्य आणि आवश्यक ती मदत तातडीने पोहचवण्याची विनंती केली. याबाबत उत्तराखंड सरकारनेही सकारात्मक प्रतिसाद देत शक्य तेवढ्या लवकर रस्ता पूर्ववत करून अडकलेल्या पर्यटकांपर्यंत मदत पोहचवण्यात येईल असे सांगितले. सध्या परिस्थिती आटोक्यात आणण्याचे प्रयत्न उत्तराखंड सरकारकडून सुरू असून शक्य तितक्या लवकर महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांपर्यंत पोहचून त्यांना परत पाठवण्याची व्यवस्था केली जाईल असे सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी ठरतं घातक

हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…

12 तास ago

आंबट ढेकर, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय

कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…

12 तास ago

आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो

1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…

12 तास ago

7 तारखेपर्यंत पगार अनिवार्य; नोकरी सोडल्यानंतर 2 दिवसांत Full & Final, नवीन कामगार नियमांची माहिती

मुंबई : कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळावे आणि नोकरी सोडल्यानंतर देय रक्कम मिळण्यासाठी होणारा विलंब टाळावा,…

12 तास ago

प्रदीप कबरे यांच्या ‘खिडकी’ अभिवाचनाचा विशेष प्रयोग ३० जुलैला दादरच्या शिवाजी मंदिरात

मुंबई: प्रसिद्ध नाटककार प्रदीप कबरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या 'खिडकी' या पुस्तकातील निवडक अनुभवांवर आधारित…

12 तास ago

अपघातग्रस्त तरुणीला सुनेत्रा पवार यांची तात्काळ मदत; रुग्णालयात दाखल करून उपचाराची केली व्यवस्था

बारामतीत विकासकामांच्या पाहणीदरम्यान थांबवला ताफा; जखमी तरुणीच्या उपचारासाठी अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना बारामती: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित…

13 तास ago