महाराष्ट्र

पंढरपूर विकास आराखड्यासाठी 15 कोटी मंजूर केल्याबद्दल डॉ. नीलम गो-हे यांनी शासनाचे मानले आभार

मुंबई: महाराष्ट्र शासनाने दिनांक 30 जून 2025 च्या शासन निर्णया नुसार पंढरपूर मंदिर विकास आराखड्यासाठी 2025- 26 या वर्षांमध्ये 15 कोटी एवढा निधी वितरित केला आहे या निधीमधून पंढरपूर मंदिर विकास आराखडा अंतर्गत मंजूर कामावर वर होणारा खर्च करण्यासाठी मोठी संधी मिळालेली आहे. आषाढी वारीच्या काळामध्ये राज्य शासनाने हा निधी वितरित केलेला असल्यामुळे मंदिराच्या विकास कामासाठी मोठीच मदत होणार आहे.

हा निधी वितरित केल्याबद्दल विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा.श्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री मा.श्री अजितदादा पवार यांचे आभार व्यक्त केले आहेत आणि या निधीच्या प्रभावी वापरातून सर्व वारकऱ्यांची यात्रा कालावधीमध्ये अधिकची सोय राज्य शासनामार्फत करण्यात येत आहे, याबद्दल आनंद व्यक्त केला आहे . तसेच सर्व यंत्रणांचे आभार मानले आहेत आणि सर्व वारकऱ्यांना यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

11 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

11 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

11 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago