महाराष्ट्र

केसरकरांच्या वक्तव्यानुसार एकनाथ शिंदेंच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली होती का?

मुंबई: सत्तांतराचे बंड यशस्वी झाले नसते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोळी झाडून घेतली असती या दिपक केसरकरांच्या वक्तव्यानुसार एकनाथ शिंदे यांच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली होती का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्रात झालेल्या सर्वात मोठ्या सत्तांतराच्या नाट्यमय घटनाबाबत काही गोष्टींचा खुलासा मंत्री दीपक केसरकर यांनी नुकताच प्रसारमाध्यमांसमोर केला त्यावर बोलताना महेश तपासे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना परमेश्वर दीर्घायुष्य देवो परंतु ज्यापद्धतीने दीपक केसरकर यांनी बंडाबाबत काही गोष्टींचा खुलासा केला व बंड अयशस्वी झाल्यास काय झाले असते असे सांगितले त्यातून स्वाभाविकच काही प्रश्न निर्माण होतात असेही महेश तपासे म्हणाले.

एकेकाळी अमर्यादित असे अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये होते. ते ठरवतील ती पूर्व दिशा, एवढा मान उध्दव ठाकरे कुटुंबाने दिला होता याची आठवणही महेश तपासे यांनी करून दिली आहे. मात्र आज एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावर बसून देखील भाजपच्या इशाऱ्यावर चालावे लागते आहे ही शोकांतिका आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत किती जागा शिंदे गटाला मिळतील याबाबत एकनाथ शिंदेंच्या आमदारांना व खासदारांनाच खात्री नाही असेही महेश तपासे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपच्या स्थानिक नेत्यांनी पूर्णपणे असहकार्याची भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाने ‘राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ अशी ठळक जाहिरात वर्तमानपत्रात करुन भाजपला अंगावर घेण्याचा प्रयत्न केला मात्र दुसऱ्या दिवशीच जाहिरातीचा मजकूर बदलवून घ्यावा लागला इतका दबाव भाजपने मुख्यमंत्र्यांवर आणल्याचे चित्र होते.

मंत्रिमंडळाचा विस्तार असो की इतर कुठल्याही महत्वपूर्ण बाबींचे निर्णय असो तेथे केंद्रातील भाजपच्या नेत्यांनी हिरवा कंदील दाखवल्याशिवाय मुख्यमंत्री महोदयांना निर्णय घेता येऊ शकत नाही हे सध्या महाराष्ट्र उघड्या डोळ्याने पाहत आहे असा टोलाही महेश तपासे यांनी लगावला. बंडाच्या काळामध्ये एकनाथ शिंदे यांच्या मनावर नक्कीच दडपण असू शकेल परंतु त्यापेक्षा मोठा दबाव आज भाजपचा आहे हे कोणी नाकारू शकत नाही असेही महेश तपासे म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वय वाढल्यामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो असा परिणाम

आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…

4 तास ago

हृदयासाठीही फायदेशीर आहे आवळ्याचं ज्यूस!

आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…

4 तास ago

बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; एकनाथ शिंदेंचा निर्धार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

4 तास ago

ओबीसींच्या स्वतंत्र जनगणना कॉलमसाठी वडेट्टीवारांचा एल्गार! २ नोव्हेंबरला भारत बंद, १५ नोव्हेंबरला दिल्लीत शक्तिप्रदर्शन

नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…

5 तास ago

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क; सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांना मतदानाचे आवाहन

बारामती: श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा…

5 तास ago

शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटारी चोरीला; गुन्हा दाखल…

न्हावरे (तेजस फडके): इनामगाव (ता.शिरुर) येथे शेतजमिनीतून दोन विद्युत मोटारी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली…

10 तास ago