महाराष्ट्र

ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा विराट जनआक्रोश मोर्चा; भाजप सरकारवर घणाघाती हल्लाबोल

महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न, लाडकी बहीण योजना आणि स्मार्ट मीटरवरून सरकारवर टीका; तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन

ब्रह्मपुरी: केंद्र आणि राज्य सरकारच्या कथित जनविरोधी धोरणांविरोधात काँग्रेसतर्फे ब्रह्मपुरी येथे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली विराट जनआक्रोश महामोर्चा काढण्यात आला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडांगण येथून निघालेल्या या मोर्चात हजारो नागरिक, महिला, युवक, शेतकरी, कामगार तसेच काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले. सरकारविरोधी घोषणांनी शहर दणाणून गेले.

मोर्चाला संबोधित करताना विजय वडेट्टीवार यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांची सुरक्षा, स्मार्ट मीटर, लाडकी बहीण योजना, कर्जमाफी आणि धान उत्पादकांना बोनस न मिळाल्याचा मुद्दा उपस्थित करत सरकार जनतेच्या अपेक्षांवर अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.

गोसेखुर्द प्रकल्पासाठी काँग्रेस सरकारच्या काळात मोठा निधी मंजूर करण्यात आला होता, मात्र सध्याच्या सरकारकडून विकासकामांना गती मिळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. समृद्धी महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी सुपीक शेती कमी मोबदल्यात संपादित करण्याचा प्रयत्न होत असून, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काँग्रेस लढा सुरू ठेवेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील शिक्षण व्यवस्थेवर टीका करत हजारो शाळा बंद करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आल्याचा दावा त्यांनी केला. तसेच जंतर-मंतरवरील युवकांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करत जनतेचा रोष आगामी काळात सरकारला महागात पडेल, असा इशाराही त्यांनी दिला.

युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनीही सरकारच्या धोरणांवर टीका करत अन्यायाविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले. मोर्चाच्या समारोपानंतर तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आले. महागाई नियंत्रणात आणणे, बेरोजगारांना रोजगार, शेतकऱ्यांना हमीभाव, महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना आणि सर्वसामान्यांवरील आर्थिक भार कमी करण्याच्या मागण्या निवेदनात करण्यात आल्या.

या मोर्चामुळे ब्रह्मपुरीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, काँग्रेसने सरकारविरोधातील जनतेचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाला युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, जिल्हाध्यक्ष विश्वजीत कोवासे, खेमराज तिडके, हितेंद्र राऊत, प्रभाकर सेलोकर, राजेश कांबळे, प्रमोद चिमुरकर, योगेश मिसार, डॉ. नितीन उराडे, थानेश्वर कायरकर, सोनू नाकतोडे यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

1 तास ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

2 तास ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

17 तास ago

पाबळ-कान्हूर-केंदूर! निवडणूक आली की पाण्याची चर्चा; टंचाई मात्र कायमच!

पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…

17 तास ago

रांजणगावमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी 12 तासात अटक LCB आणि रांजणगाव MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…

22 तास ago

शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…

1 दिवस ago