मुख्य बातम्या

पुणे ग्रामीण पोलीसांनी वेल्हे येथील दर्शना पवार खून प्रकरणाचा केला उलगडा; आरोपी जेरबंद

शिरुर (तेजस फडके): वेल्हे पोलीस स्टेशन हद्दीतील गुंजवणे गावच्या हद्दीत सतीचा माळ या ठिकाणी दि 18 जुन 2023 रोजी दर्शना पवार हिचा मृतदेह आढळून आला होता. हा गुन्हा घडल्यापासून यातील संशयित सुधीर ऊर्फ राहुल दत्तात्रय हंडोरे, पळून गेला असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन पोलिस तपास पथकांनी संशयीत राहुल दत्तात्रय हांडोरे याचा शोध घेऊन त्याला मुंबई, अंधेरी रेल्वे स्टेशन येथून ताब्यात घेतलेले असुन त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 12 जुन 2023 रोजी 10 वाजता दर्शना हि सिंहगड किल्ला फिरण्यास जाते असे सांगून घरुन निघुन गेली होती. त्यानंतर ती परत आली नसल्याने दर्शनाचे वडील दत्ता दिनकर पवार यांनी सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे दि. 15 जुन 2023 रोजी याबाबत मिसिंगची केस दाखल होती. सदर गुन्हयाचे गांभीर्य पाहून पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल आणि अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांनी तात्काळ गुन्हा उघडकीस आणून आरोपी अटक करण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखा व वेल्हे पोलीसांची विशेष पथके तयार केलेली होती.

त्यानंतर (दि 18) रोजी वेल्हे पोलीस स्टेशन हद्दीतील गुंजवणे गावच्या हद्दीत सतीचा माळ या ठिकाणी दर्शनाचा मृतदेह सापडला त्या मृतदेहाचे शेजारी ओपो कंपनीचा मोबाईल फोन, काळ्या रंगाचा गॉगल तसेच काळया रंगाची बॅग आणि निळया रंगाचे जर्किंग अशा वस्तु मिळून आल्या होत्या. सदर गुन्हयाचा तपास करीत असताना तपास पथकास परिस्थितीजन्य पुरावे व प्रत्यक्षदर्शी साक्षिदारांकडून मिळालेल्या माहितीवरुन सुधीर ऊर्फ राहुल दत्तात्रय हंडोरे (वय 28) रा. हिंगणे होम कॉलनी,  दत्तमंदीराजवळ, कर्वेनगर, पुणे, मुळ रा. मु.पो. शहा, ता. सिन्नर, जि. नाशीक हा गुन्हयातील मुख्य संशयीत असल्याचे व तो गुन्हा घडल्यापासून पळून गेला असल्याचे निष्पन्न झाले त्यावरून तपास पथकांनी संशयीत राहुल दत्तात्रय हांडोरे याचा शोध घेऊन अंधेरी रेल्वे स्टेशन येथून ताब्यात घेतलेले असून त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले आहे.

सदर गुन्हयाच्या तपास करण्याकरीता पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, हवेली विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलिस निरीक्षक राहुल गावडे, पोलिस उपनिरीक्षक प्रदिप चौधरी, पोलिस हवालदार रामदास बाबर, हेमंत विरोळे, राजू मोमीन, पोलिस नाईक अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, तुषार भोईटे, मंगेश भगत, पोलिस कॉन्स्टेबल दगडु विरकर तसेच वेल्हे पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांनी पोलिस हवालदार योगेश जाधव, ज्ञानदीप धिवार,औदुंबर अडवाल, राहूल काळे, पोलिस नाईक अजय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल आकाश पाटील, पोलिस हवालदार गणेश चंदनशिव, पोलिस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर शेडगे, होमगार्ड विजय घोयने, विक्रांत गायकवाड व पोलीस मित्र संतोष पाटोळे यांची वेगवेगळी पथके तयार करुन रवाना केलेली होती.

त्यांनी गुन्हयातील आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणलेला आहे. आरोपीचा गुन्हा करण्यामागील मुख्य हेतु तसेच गुन्हयाचा घटनाक्रम याबाबत तपास चालू आहे गुन्हयाचा पुढील तपास हवेली विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले हे करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नागरिकांच्या सतर्कतेने आठवडे बाजारातील सलग सात चोरटे जेरबंद

मदत करणाऱ्या नागरिकांचा शिक्रापूर पोलिसांकडून सत्कार शिक्रापूर (): शिक्रापूर पोलीस ठाण्याने गेल्या दीड महिन्यापासून शिक्रापूर,…

5 तास ago

मांडवगण फराट्यात डॉ अतुल सुराणा ठरले ‘देवदूत’; बेशुद्ध रुग्णाला CPR देऊन वाचवला जीव

न्हावरे (अक्षय टेमगिरे): मांडवगण फराटा (ता.शिरुर) येथील आनंद हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाची प्रकृती अचानक…

5 तास ago

रांजणगाव गणपतीतील सोन्याच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने हातचलाखी करत ८२ चांदीचे जोडवे लांबवले

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील एका सराफ दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चार अज्ञात…

19 तास ago

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…

1 दिवस ago

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…

1 दिवस ago

झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…

1 दिवस ago