महाराष्ट्र

दिलीप वळसे पाटील यांचा अपघात, हात फ्रॅक्चर तर…

पुणे : मंत्री दिलीप वळसे पाटील हे घरातमध्येच पाय घसरुन पडल्यामुळे त्यांना दुखापत झाली आहे. त्यांच्या खुब्याला मार लागला असून, हाथ फ्रॅक्चर झाला आहे. पुणे शहरातील एका खाजगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. याच रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांची महत्वाची भूमिका आहे. मात्र ऐन लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडवरच त्यांचा अपघात झाला आहे. ट्विट करुन त्यांनी ही माहिती दिली आहे.

‘काल रात्री राहत्या घरात पडल्यामुळे मला फ्रॅक्चर झाले असून डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार सुरू आहेत. काही काळ पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. लवकरच बरा होऊन आपल्या समवेत सामाजिक कामात सक्रिय होईल’, असे त्यांनी ट्विटमध्ये लिहिल आहे.

लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. महायुतीचे उमेदवार अजून जाहीर झाले नाहीत. बारामती, मावळ आणि शिरुर या तिन्ही लोकसभा मतदार संघात उमेदवार कोण अशा चर्चा सुरु आहे. अजित पवार गटातून या लोकसभा मतदार संघात उमेदवार देण्यात येणार आहेत. या तिन्ही लोकसभा मतदार संघाची जबाबदारी पक्षाचे तगडे नेते म्हणून वळसे पाटील यांच्यावर आहे. ऐन निवडणूक तोंडावर आली असताना आणि प्रचार सुरु करायच्या आधीच वळसे पाटील यांना अपघात झाला आहे. त्यामुळे वळसे पाटील यांना आता घरातूनच सुत्र हालवावी लागण्याची शक्यता आहे.

Video: शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पाया पडले अमोल कोल्हे…

शिवाजीराव आढळराव पाटील यांचा अखेर राष्ट्रवादीत प्रवेश…

मानसपुत्र दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात धडाडणार शरद पवार यांची तोफ…

ग्रामपंचायत निवडणूक! दिलीप वळसे पाटील यांना स्वतःच्या गावातच धक्का…

वळसे-पाटील साहेब तुम्हाला काय कमी केले होतं? का पत्करली गुलामी…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

15 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago