sharad pawar dilip walse patil

वळसे-पाटील साहेब तुम्हाला काय कमी केले होतं? का पत्करली गुलामी…

राजकीय

शिरूर (तेजस फडके) शिरूर-आंबेगाव मतदार संघातून सात वेळा निवडून आलेले दिलीप वळसे पाटील हे अजित पवार यांच्यासोबत गेल्यामुळे शिरूर तालुक्यात नाराजीचा सुरू आहे. सोशल मीडियावर अनेकांनी आपली नाराजी व्यक्त करत दिलीप वळसे पाटील यांच्यावर टीका केली आहे. शिवाय, रोहित पवार यांनी सुद्धा ट्विट करत तुम्हाला काय केलं होतं कमी? का पत्करली गुलामी? असा प्रश्न विचारून नाराजी व्यक्त केली आहे.

अजित पवार यांनी रविवारी (ता. २) सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. पण त्याहीपेक्षा जास्त मोठा धक्का प्रफुल पटेल, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे. शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवारांना पाठिंबा कसा काय दिला हाच प्रश्न सर्वांना सतावत आहे.

रोहित पवार यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, ‘मा. वळसे-पाटील साहेब आदरणीय पवार साहेबांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे जपलेला नेता म्हणून तुम्हाला महाराष्ट्र ओळखतो. तुमच्यावर तर साहेबांचा सर्वाधिक विश्वास होता. पण अचानक असं काय संकट आलं की तुम्हाला आपली निष्ठा गहाण ठेवावी लागली. आपल्या विचारधारेला मूठमाती द्यावी लागली, हे महाराष्ट्राला जाणून घ्यायचंय. केवळ सत्तेसाठी अशा प्रकारची बंडखोरी आपल्या सारख्या जेष्ठ नेत्याकडून अपेक्षित नव्हती.
असो!
प्रत्येक संकटावर मात करण्याची ताकद आमच्या #सह्याद्रीत आहे. सह्याद्रीच्या बाजूने संपूर्ण महाराष्ट्र उभा असून हा सह्याद्री नव्या जोमाने आणि नव्या ताकदीने उभा राहीलच, परंतु वळसे-पाटील साहेब तुम्ही स्वतःला तुमच्या या कृतीबद्दल माफ करू शकणार का?

#तुम्हाला_काय_केलं_होतं_कमी?
#का_पत्करली_गुलामी?’

दिलीप वळसे पाटील यांच्या मक्तेदारीला मतदार संघातूनच आव्हान…

दिलीप वळसे पाटील गेल्यामुळे शरद पवारांच्या डोळ्यात अश्रू…