महाराष्ट्र

शंभूराजांची पुण्यतिथी साजरी करण्यासाठी ३०-४० लाख रुपयांचा निधी द्या

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी काल वीधानसभेत स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमासाठी निधी वाढवून देण्यात यावे, अशी मागणी विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून केली.

स्वराज्याचरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी तिथीप्रमाणे येत्या २९ मार्च २०२५ रोजी येत आहे.‌ यावर जयंतराव पाटील यांनी सभागृहात लक्षवेधले ते म्हणाले की सध्याचे वातावरण पाहता, लोखो शंभू प्रेमी तुळापूर येथील शंभूराजांच्या स्मारक परिसरात जमण्याची शक्यता आहे. पण पुण्यतिथी कार्यक्रमासाठी शासनाने फार तुटपुंजा निधी दिला आहे. आमची मागणी आहे की सर्व शंभूभक्त, शंभूप्रेमींची भावना लक्षात घेता, पुण्यतिथी कार्यक्रमाची व्याप्ती लक्षात घेता शासनाने या निधीत वाढ करावी. हा निधी ३० ते ४० रुपयांचा करावा असे म्हणाले तसेच दरवर्षी या कार्यक्रमासाठी निधी उपलब्ध करून द्यावा असेही त्यांनी जोडले. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, पुण्यतिथी कार्यक्रमासाठी निधी कमी पडणार नाही असे आश्वासन सभागृहात दिले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

14 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago