महाशिवरात्री हा शिवभक्तांसाठी अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी भगवान शंकरासह देवी पार्वतीची देखील विधीवत पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शंकर आणि पार्वतीचा विवाह संपन्न झाला होता. म्हणून महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो.
महाशिवरात्रीच्या दिवशी कोणती ५ फुलं महादेवाला प्रिय आहेत, जी वाहायला हवीत. इतकेच नाही तर ही फुले अनेक दुखण्याखुपण्यावर रामबाण उपाय आहेत. आयुर्वेदात अशी काही फुले आहे जी धार्मिक कार्यात देखील महत्त्वाची मानली जातात. ज्याचा वापर आपल्या शरीरासाठी बहुगुणी समजला जातो.
चमेलीचे फुल महादेवाला अर्पण केल्याने प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात. तसेच त्वचेसाठी आणि केसासाठी चमेलीचे फुल फायदेशीर आहे. या फुलाचा सुगंध घेतल्याने स्ट्रेस कमी होतो. याचा चहा प्यायल्याने शरीर स्लिम होते.
निळ्या रंगाचे गोकर्ण फूल भगवान शंकराला प्रिय आहे. असे म्हटले जाते हे फूल शिवपिंडीवर चढवल्याने आर्थिक अडचणी दूर होतात. या फुलामध्ये अँटिऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे त्वचेची जळजळ कमी करण्यास मदत करते. शरीरातील कोलेजन वाढवते.
धतुऱ्याचे फूल महादेवाला अर्पण केल्याने दु:खातून आणि त्रासातून आपल्याला मुक्ती मिळते. तसेच या फुलाचा आर्युर्वेदात वापर केला जातो. याच्या पानांचा धूर दमा कमी करण्यास मदत करतो. याच्या पानांचा अर्क कानात टाकल्याने डोळ्यांच्या समस्या कमी होतात.
बेलाचे पान शंकराला अतिशय प्रिय आहे. यामध्ये त्रैमूर्तिचा वास असतो असे म्हटले जाते. यामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत जे हृदयाचे आरोग्य निरोगी राखण्यास मदत करतात. बेलाचे पान चावून खाल्ल्याने हृदय मजबूत होते.
शिवपिंडीवर आक फुले अर्पण केले जाते. याचा वापर केल्याने त्वचेवरील डाग, सुरकुत्या कमी करण्यास मदत होते. तसेच डोकेदुखी, गुडघेदुखी, कान, दात दुखणे यावर रामबाण ठरते. ही एक औषधी वनस्पती म्हणून ओळखली जाते.
(सोशल मीडियावरून साभार)
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …