महाराष्ट्र

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती उभारण्यापेक्षा ग्राहकांचा विश्वास जिंकणारे ‘विश्वासाचे शहर’ उभे करावे,” असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पुण्यातील व्यंकटेश वनाया प्रकल्पाच्या भूमिपूजन व शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी पुण्याच्या विकासाला गती देण्यासाठी सरकारकडून आवश्यक सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

व्यंकटेश बिल्डकॉनच्या २५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचे कौतुक करताना शिंदे म्हणाले की, आसबे बंधूंनी अवघ्या २० वर्षांत केलेले व्यावसायिक सीमोल्लंघन कौतुकास्पद आहे. व्यंकटेश वनाया प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांच्या यशाची नवी पताका फडकत आहे. गुणवत्ता, आधुनिक सुविधा आणि ग्राहकांचा विश्वास या त्रिसूत्रीच्या बळावर बांधकाम क्षेत्रात यशस्वी वाटचाल करता येते, हे या प्रकल्पातून दिसून येते.

मराठी उद्योजकांनी देश-विदेशात उमटवला ठसा

“मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही, हा गैरसमज आता दूर झाला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी नोकरी मागणारे नव्हे, तर नोकरी देणारे हात तयार करण्याचा विचार मांडत असत. आज मराठी उद्योजक देशासह परदेशातही आपला ठसा उमटवत आहेत. दावोस आणि लंडनमध्ये मराठी उद्योजक भेटतात, ही अभिमानाची बाब आहे,” असे शिंदे यांनी नमूद केले.

तरुणांना केवळ रोजगार मिळवून देण्याऐवजी त्यांना उद्योजक बनविण्यावर सरकारचा भर आहे. स्टार्टअप आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

विकासकांच्या अडचणी सोडविण्यासाठी धोरणात्मक बदल

कोविड काळात बांधकाम क्षेत्राला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या पार्श्वभूमीवर युनिफाइड डीसीपीआरमधील बदल करताना क्रेडाई, नरेडको आणि विकासकांशी चर्चा करून त्यांच्या प्रत्यक्ष अडचणी धोरणात समाविष्ट करण्यात आल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

एफएसआय, बाल्कनी आणि फ्लॉवर बेड यांचे इंच-इंच मोजण्यापेक्षा विकासाला चालना देणे आणि त्याचा अंतिम लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचविणे महत्त्वाचे आहे, अशी सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. रिअल इस्टेट क्षेत्राशी अनेक पूरक उद्योग जोडलेले असून लाखो लोकांच्या रोजगाराचे गणित या क्षेत्रावर अवलंबून आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्राच्या वाढीसाठी सरकारची भूमिका सकारात्मक आणि विकासपूरक असल्याचे त्यांनी नमूद केले.

पुणे झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी पुनर्विकासाला चालना

पुणे शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट, धोकादायक इमारतींचा पुनर्विकास आणि आवश्यक नियमांमध्ये शिथिलता आणण्याबाबत गृहनिर्माण विभागाकडून सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. नियोजनबद्ध शहरीकरण, आधुनिक पायाभूत सुविधा आणि सुरक्षित निवासव्यवस्था यांना प्राधान्य देण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.

व्यंकटेश वनाया प्रकल्पातील गार्डन, मैदान, क्लब हाऊस, जिम्नॅशियम तसेच इनडोअर आणि आउटडोअर खेळांच्या सुविधांचे त्यांनी कौतुक केले. दर्जेदार बांधकामासोबतच रहिवाशांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्यास ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ होतो, असे ते म्हणाले.

पुणे-मुंबई कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गामुळे आयटी, ऑटोमोबाईल, सेवा आणि रिअल इस्टेट क्षेत्राला मोठी चालना मिळाली आहे. आता मिसिंग लिंक, पुणे रिंगरोड आणि मेट्रोच्या विस्तारामुळे कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

राज्य सरकारचे लक्ष केवळ मुंबई आणि ठाण्याच्या विकासावर नसून पुण्याच्या विकासालाही तेवढेच प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुणे-मुंबई परिसरात मोठे प्रकल्प उभारण्यासाठी विकासकांनी पुढाकार घ्यावा. प्रकल्पांच्या उभारणीत अडचणी आल्यास सरकार आवश्यक सहकार्य करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

‘अडचण आली तर सरकार तुमच्या पाठीशी’

या प्रकल्पाच्या उभारणीत जमीनमालक, आर्किटेक्ट, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सहकाऱ्यांनी दिलेल्या योगदानाचे शिंदे यांनी विशेष कौतुक केले. “किरण सामंत यांच्या मागे एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे. अडचण आली, तर सरकार तुमच्या पाठीशी आहे,” असे सांगत त्यांनी सहकार्याची ग्वाही दिली.व्यंकटेश बिल्डकॉनच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देताना पुण्याच्या विकासात दर्जेदार बांधकाम प्रकल्पांनी महत्त्वाची भूमिका बजावावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर, आमदार बापूसाहेब पठारे, आमदार किरण सामंत, आमदार माऊली कटके, माजी आमदार जगदीश मुळीक, आमदार सुनील टिंगरे, संकेत बावनकुळे, अभिषेक थोरवे, अरुण जिंदाल, कुमार गोसावी, अंकुश आसबे, लहूराज आसबे यांच्यासह व्यंकटेश बिल्डकॉनचे अधिकारी, कर्मचारी आणि पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

3 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

3 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

3 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

4 तास ago

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

9 तास ago

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

16 तास ago