पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना लागू असलेल्या सर्व सवलतींचा लाभ देण्यासोबतच दिवाळीपूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची अग्रीम मदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. ‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही,’ अशी ठाम ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
पुण्यातील खराडी येथे व्यंकटेश वनाया या प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी आले असताना शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली.
‘शेतकरी हा आमचा अन्नदाता आणि केंद्रबिंदू आहे. त्याला मदत देताना सरकार हात आखडता घेणार नाही. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले जाणार नाही,’ असे शिंदे यांनी स्पष्ट केले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारकडूनही मदतीची अपेक्षा
राज्य सरकारच्या मदतीसोबतच केंद्र सरकारकडूनही शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा असल्याचे शिंदे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यासंदर्भात आश्वस्त केले असून, राज्य सरकार केंद्राकडे मदतीसाठी सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘फेक नॅरेटिव्ह’वरून विरोधकांवर निशाणा
दरम्यान, विरोधकांकडून ‘फेक नॅरेटिव्ह’च्या माध्यमातून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. सर्वोच्च न्यायव्यवस्थेविरोधात मोर्चा काढण्याच्या प्रकारावरून त्यांनी विरोधकांवर टीका केली.
‘संविधानाचा उल्लेख करणाऱ्यांनी संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांचाही सन्मान राखला पाहिजे,’ असा टोला त्यांनी राहुल गांधी यांना लगावला.
भारताच्या प्रगतीवरूनही विरोधकांना लक्ष्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत असून, देश आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे शिंदे म्हणाले. भारताची ही प्रगती काहींना खटकत असल्याची टीका करत, देशाला बदनाम करण्याचे प्रयत्न जनता हाणून पाडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
एकीकडे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याची घोषणा, तर दुसरीकडे विरोधकांच्या भूमिकेवर टीका, अशा दुहेरी मुद्द्यांवरून एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत सरकारची भूमिका मांडली.
पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…
शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…
बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…
अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…
खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…
ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…