महाराष्ट्र

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष

मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून, शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवार, १८ ऑक्टोबर रोजी अमरावतीत जाहीर सभा घेणार आहेत. अमरावती शिक्षक मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि विद्यमान आमदार किरण सरनाईक यांच्या प्रचारार्थ ही सभा होणार आहे. या सभेत शिंदे काय भूमिका मांडणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

अमरावती शिक्षक मतदारसंघातून महायुतीने शिवसेनेचे विद्यमान आमदार किरण सरनाईक यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री शिंदे अमरावती दौऱ्यावर येत असून, सभेच्या यशस्वितेसाठी सरनाईक यांच्या समर्थकांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.

विधान परिषदेच्या पाचही जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यापूर्वी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर अमरावतीतील सभेतून महायुतीच्या प्रचाराला बळ मिळण्याची अपेक्षा पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. शिंदे यांच्या सभेमुळे सरनाईक यांच्या प्रचाराला अधिक गती मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, आमदार म्हणून किरण सरनाईक यांनी विधान परिषदेत केलेल्या कामाचा आढावा शिंदे आपल्या भाषणातून घेण्याची शक्यता आहे. तसेच शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, त्यांच्या मागण्या आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित मुद्द्यांवरही ते भाष्य करण्याची अपेक्षा आहे. या सभेला जिल्ह्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता असून, अमरावती शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रचारात या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

3 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

3 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

3 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

4 तास ago

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

9 तास ago

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

16 तास ago