महाराष्ट्र

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ योजनेला गती; राज्यात ४०५ शाळा विकसित करण्यास मंजुरी

मुंबई: राज्यातील शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेत राज्य शासनाने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना’च्या पुढील टप्प्यात ४०५ शाळा विकसित करण्यास मंजुरी दिली आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी ही माहिती दिली.

‘विकसित महाराष्ट्र-२०४७’ या दृष्टीकोनाशी सुसंगत असलेल्या या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार व सुसज्ज शैक्षणिक सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास मंत्री भुसे यांनी व्यक्त केला. याबाबतचा शासन निर्णयही प्रसिद्ध करण्यात आला आहे.

या निर्णयामुळे ग्रामीण व शहरी भागातील शाळांमधील भौतिक तसेच शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार असून विद्यार्थ्यांना समतोल व गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील.

यापूर्वी या योजनेच्या पहिल्या टप्प्यात ४७८ शाळांची निवड करण्यात आली होती. त्या शाळांमधील विकासकामे अंतिम टप्प्यात असून आता नव्याने ४०५ शाळांचा समावेश करण्यात आल्याने योजनेचा विस्तार अधिक वेगाने होणार आहे.

या योजनेत समूह साधन केंद्र शाळा, पीएमश्री शाळा आणि विद्यानिकेतन शाळांचा समावेश करण्यात येणार आहे. इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत अखंड व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी प्रत्येक शाळेसाठी सविस्तर विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

योजनेअंतर्गत शाळांमध्ये मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, शुद्ध पिण्याचे पाणी, आरओ किंवा यूव्ही फिल्टर यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर राहणार आहे. तसेच विद्यार्थिनींसाठी ‘पिंक रूम’ची सुविधा निर्माण करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे.

प्रत्येक जिल्ह्यात किमान एक शाळा ‘क्रीडा प्रबोधिनी’ म्हणून विकसित करण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक निधी शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्यामार्फत जिल्हानिहाय वितरित केला जाणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

3 मिनिटे ago

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

7 तास ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

1 दिवस ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago