महाराष्ट्र

१.१४ लाख कोटींच्या ‘ग्रीन एआय कॉम्प्युट हब’ करारामागे डॉ. श्रीकांत शिंदे यांचा पाठपुरावा; उदय सामंत

एमएमआरमध्ये उभारला जाणार ५०० मेगावॅट क्षमतेचा ग्रीन एआय डेटा सेंटर पार्क; ३ हजारांपर्यंत रोजगारनिर्मितीची शक्यता

मुंबई: मुंबई महानगर क्षेत्रात ५०० मेगावॅट क्षमतेचा ‘ग्रीन एआय कॉम्प्युट हब’ आणि डेटा सेंटर पार्क उभारण्यासाठी एएम इंटेलिजन्स लॅब्ससोबत करण्यात आलेला १.१४ लाख कोटी रुपयांचा सामंजस्य करार हा शिवसेना खासदार Dr. Shrikant Shinde यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे यश असल्याचे उद्योगमंत्री Uday Samant यांनी म्हटले आहे.

उद्योगमंत्री सामंत यांनी एक्सवरील पोस्टद्वारे खासदार डॉ. शिंदे यांचे आभार मानले. उद्योग क्षेत्रात तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विशेष निमंत्रणावरून एएम इंटेलिजन्स लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसोबत महाराष्ट्र शासनाने तब्बल १२ अब्ज डॉलर्स अर्थात १.१४ लाख कोटी रुपयांचा करार केला. मुंबई आणि नवी दिल्ली येथे झालेल्या सातत्यपूर्ण बैठका व समन्वयातून हा करार साकार झाल्याचे सामंत यांनी सांगितले.

या प्रकल्पाअंतर्गत मुंबई महानगर क्षेत्रात ५०० मेगावॅट क्षमतेचा ‘ग्रीन एआय कॉम्प्युट हब’ आणि आधुनिक डेटा सेंटर पार्क उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प २४ तास नवीकरणीय ऊर्जेवर चालणारा देशातील अग्रगण्य उपक्रम ठरणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या गुंतवणुकीमुळे सुमारे २ हजार ते ३ हजार उच्च-तंत्रज्ञान आधारित रोजगार निर्माण होणार असून महाराष्ट्राला देशाची ‘डिजिटल आणि एआय राजधानी’ बनवण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे उद्योगमंत्री सामंत यांनी म्हटले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

2 तास ago

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी; आणखी दोन महिने वाढवा

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…

2 तास ago

Video: शिरूर तालुक्यात गोळीबार, डोक्यात गोळी लागल्याने एकाचा मृत्यू; गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…

18 तास ago

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

2 दिवस ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

2 दिवस ago

‘दादा… तुम्ही नाही, हे मन आजही मानायला तयार नाही’; सुनेत्रा पवार भावुक

बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…

2 दिवस ago