महाराष्ट्र

दिविजा वृद्धाश्रम मार्फत शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

तळेरे: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमाकडून कणकवली व देवगड तालुक्यातील हजार शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना शैक्षणिक प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने संस्थेचे सेक्रेटरी संदेश शेट्ये यांनी ग्रामीण भागातील २९ शाळेतील हजार विद्यार्थ्यांना दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांकडून आपल्या शालेय नातवंडाना शैक्षणिक साहित्य भेट म्हणून देण्यात आले.

आजी आजोबांनी आपली नातवंडे शिकताना त्यांना प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या शैक्षणिक गरजांची पूर्तता व्हावी या उद्देशाने त्यांना या भेट वस्तू दिल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांना या भेटी सोबत आजी आजोबांनी भरभरून आशीर्वाद देण्यात आले. या भेटवस्तूमध्ये शालेय दप्तर, लॉंग बुक, एकेरी वही, चौखडी वही, चौरेघी वही, अंकलपी, कंपास बॉक्स, रंग खडू, पेन, पेन्सिल पट्टी कीट आदी वस्तू विद्यार्थ्यांना देण्यात आल्यात.

काही प्राथमिक शाळांना कॅरम भेट देण्यात आले तर इंग्लिश मिडीयम स्कूल फोंडा शाळेतील शिक्षक दत्तगुरू चव्हाण यांनी राबवलेल्या वाचनालय उपक्रमात आजी आजोबांनी वाचलेली १०० पुस्तके शालेय विद्यार्थ्यांना वाचनालयाच्या उपक्रमात मोफत भेट देण्यात आली.

दिविजा वृद्धाश्रम मार्फत शाळा नवीन कुर्ली वसाहत फोंडाघाट, बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल कणकवली, जि.प.प्राथमिक उर्दू शाळा नांदगाव, खा.प.शाळा असलदे तावडेवाडी, जि.प.प्राथमिक शाळा बिडवाडी कणखरे, जि.प.प्राथमिक शाळा कळसुली नं १, जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा वारगाव नं.१, जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा वारगाव नं.३, जि.प.केंद्रशाळा नांदगाव नं.१, जि.प.शाळा तोंडवली गावठण, जि.प.पू.प्राथमिक शाळा तोंडवली नं.१, जि.प. प्राथमिक शाळा असलदे नं.१, जि.प.प्राथमिक शाळा असलदे गावठण, माध्यमिक शिक्षण शाळा कोळोशी हडपिड, जि.प.प्राथमिक शिक्षण शाळा कोळोशी हडपिड, जि.प.प्राथमिक शाळा कोळोशी वरचीवाडी, जि.प.प्राथमिक शिक्षण शाळा आयनल मणेरवाडी, जि.प.प्राथमिक शाळा हडपिड खालचीवाडी, जि.प.प्राथमिक शाळा शिरगाव राकसवाडी, जि.प.शाळा साळशी नं.१, जि.प.प्राथमिक शाळा शिरगाव आंबेखोल, जि.प.प्राथमिक शाळा शिरगाव निमतवाडी, जि.प.पूर्ण.प्राथमिक शाळा शिरगाव-चौकेवाडी, जि.प.केंद्रशाळा शिरगाव नं.१, जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा महाळुंगे-राणेवाडी, जि.प.पूर्ण.प्राथमिक शाळा तोरसोळे नं१, जि.प.प्राथमिक शिक्षण शाळा वळीवंडे नं.१, जि.प.प्राथमिक शाळा ओंबळ गावठण बौद्धवाडी इ. शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

5 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

11 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

11 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

12 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

12 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

12 तास ago