आरोग्य

लसणाचे उपयोग किती व कसा करावा

1) कफाशी संबंधित आजार झाल्यास लहान मुलांची गळ्यात लसणीच्या कांड्याची माळ गळ्यात घालतात.

२) लसणाची पेस्ट करून त्याचा लेप आमवातासारख्या सूज असणाऱ्या व्याधीत करतात.

३) बरगडीत वेदना होत असतील लसणाचा रस चोळावा.

४) गजकर्णासारखा खाज असलेला त्वचारोग लसणाचा रस नियमित चोळला असता बरा होतो.

५) किडा चावल्याने वेदना आणि खाज येत असेल तर लसणाचा रस चोळावा.

६) कानात वेदना होत असेल तर कानात लसूण रस घालून आटवलेले गोडेतेल सोडावे. हेच तेलं छातीवर चोळले तर कफ असूनही कोरडा वाटणारा खोकला बरा होतो.

७) भूक न लागणे , तोंडाला चव नसणे, अजीर्ण, पोटात वेदना, जंत, अशा आजारात लसणाचे नित्य सेवन करावे.

८) भात खाल्ल्याने पोट फुगत असेल तर लसूण घालून शिजवलेला भात खायला द्यावा.

९) हृदयाची अतिउत्तेजना कमी करून हृदयाला आलेली सूज लसूण कमी करतो.

१०) ३० मि.ली. दुधामध्ये लसणाच्या पाच पाकळ्या घालून दूध चांगलं गरम करावं. दररोज असं दूध प्यायल्याने जुनाट खोकला, दमा, क्षयरोग यांचा नाश होतो.

११) लसूण मनाची मरगळ घालवतो.

१२) हाड मोडले असता लसूण घालून उकळलेले दुध दिले असता हाड लवकर सांधले जाते.

१३) लसणामध्ये नैसर्गिक रित्या गंधक असते . कच्चा लसूण खाल्ला तर त्यातल्या गंधकाचे उत्सर्जन त्वचेतून घामावाटे होते. कुजणाऱ्या/ सडणार्या कुष्ठरोगात याचा विशेष फायदा होतो.

१४) तापावर औषध म्हणून लसूण वापरता येतो . जुनाट तापावर , किंवा थंडी वाजून येणाऱ्या तापावर लसूण चांगला आराम देतो.

१५) लसूण कीटकनाशक असून दररोज लसूण खाल्याने टीबीचे विषाणू मरण पावतात.

१६) अँटिबायोटिक औषधांना लसूण हा एक उत्तम पर्याय आहे. लसणाच्या एका कांडीचे चार भाग करून दोन्ही वेळच्या जेवणानंतर अध्र्या तासाने त्यातील दोन तुकडे ठेवून चघळावे नंतर पाणी प्यावे.

१७) डोकेदुखीवरही लसूण हा रामबाण उपाय आहे. लसणाच्या चार पाकळ्या ३० ग्रॅम मोहरीच्या तेलात घालून ते तेल कोमट करून डोक्याला लावल्याने डोकेदुखी थांबते. कान दुखत असल्यास हेच तेल कानात घालावे. त्वरीत आराम पडतो.

१८) ज्वरनाशक असून हाडांतला तापही यामुळे बरा होतो.

१९) शरीरास हानिकारक असलेल्या रक्तातील कोलेस्ट्रॉलला नियंत्रित ठेवण्याचे काम लसूण करते. म्हणूनच दैनंदिन आहारात दोन ते तीन लसूण पाकळ्यांचा जरूर वापर करावा.

२०) संधिवात व आपवाताचा त्रास असणाऱ्यांनी त्यांच्या रोजच्या आहारात लसणाचा समावेश केल्यास “शूल’ कमी होण्यास मदत होते. लसूण खाल्ल्याने काही लोकांना ऍसिडिटी होते. अशांनी लसूण 2-3 तास दुधात भिजवून मग खावा व भरपूर पाणी प्यावे.

२१) लसूण हा कर्करोग प्रतिबंधकदेखील आहे. लसूण नियमित खाण्यात असल्यामुळे जठर व आतड्याच्या कॅन्सरचा धोका कमी होतो, असे एका शास्त्रीय पाहणीत आढळून आले आहे. प्राण्यांवर केलेल्या एका संशोधनात लसणामुळे ट्यूमर कमी झालेला आढळून आला.

काळजी

लसूण तीक्ष्ण, उष्ण असल्याने पित्त प्रकृतीच्या व्यक्ती, गर्भिणी यांना तो वर्ज्य आहे.

जास्त लसूण खाल्ल्याने त्रास झाला तर माठातील थंडगार पाण्यात धने पावडर भिजवून ते पाणी गाळून थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने पाजावे.

गृहिणींनी भाजी, वरण आमटी व चटणीत लसणाचा सढळ हाताने वापर करावा. त्यामुळे कुटुंबातील सर्वांचे आरोग्य उत्तम राहू शकेल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

15 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

15 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

15 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

15 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

15 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

19 तास ago