महाराष्ट्र

टायगर श्रॉफच्या भेटीसाठी एकनाथ शिंदे वांद्र्यात; कलाकारांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचे निर्देश

मुंबई: बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर आज संध्याकाळी अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत टायगर श्रॉफ सुखरूप बचावल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा वांद्रे येथील त्याच्या निवासस्थानी जाऊन त्याची भेट घेतली. यावेळी त्यांनी टायगरच्या तब्येतीची विचारपूस केली तसेच त्याच्या कुटुंबीयांना धीर देत सुरक्षिततेबाबत आश्वस्त केले.

या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले की, टायगर श्रॉफ याच्यावर झालेला हल्ला अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेत तो सुदैवाने बचावला असून, हल्ल्यानंतर त्याचे संपूर्ण कुटुंब चिंतेत आहे. आपण स्वतः भेट घेऊन त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली असून कुटुंबीयांना धीर दिला आहे.

कोणताही वाद किंवा भांडण नसताना एका तरुण अभिनेत्यावर अशा प्रकारचा हल्ला होणे गंभीर बाब आहे. या घटनेमुळे श्रॉफ कुटुंबीय, विशेषतः त्याची आई आयेशा श्रॉफ, मानसिक तणावाखाली असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक

या घटनेची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, पोलीस आयुक्तांनी विशेष पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. हल्लेखोरांना तातडीने पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन शिंदे यांनी दिले.

चित्रपटसृष्टीतील सर्व कलाकारांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याच्या सूचनाही मुंबई पोलीस आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. सध्या बिश्नोई गँगसह अन्य टोळ्यांकडून सेलिब्रिटींना धमकावण्याचे प्रकार समोर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने ही बाब गांभीर्याने घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“मुंबई किंवा महाराष्ट्रात कोणत्याही गँगची दहशत आणि सेलिब्रिटींना धमकावण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. असे प्रयत्न करणाऱ्यांना पोलीस जशास तसे उत्तर देतील,” असा इशाराही शिंदे यांनी दिला.

कलाकारांनी घाबरू नये : शिंदे

१९९० च्या दशकात मुंबईतील गँगवारवर पोलिसांनी कठोर कारवाई करून नियंत्रण मिळवले होते. आताही कोणी दादागिरी करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्याची गय केली जाणार नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

सर्वसामान्य नागरिकांसह सेलिब्रिटींची सुरक्षा ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे त्यांनी सांगितले. अशा घटनांमुळे चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी घाबरून जाण्याची गरज नसून, कोणाला टोळ्यांकडून धमकीचे फोन किंवा संदेश येत असल्यास त्यांनी तातडीने मुंबई पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

सरकार कलाकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, असेही शिंदे यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना समर्पित शिवसेनेचा दसरा मेळावा; मदतीसाठी राज्यव्यापी कार्यक्रमाची घोषणा होणार

मुंबई: राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने यंदाचा दसरा मेळावा संकटग्रस्त शेतकऱ्यांना समर्पित केला आहे. गोरेगाव येथील…

1 तास ago

दुष्काळग्रस्त गावांसाठी स्वतंत्र सूक्ष्म कृती आराखडे तयार करा

धाराशिव जिल्ह्यातील पाणी, चारा टंचाईवर उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचे डॉ. राजेश देशमुख यांचे निर्देश धाराशिव: जिल्ह्यातील…

1 तास ago

मुंबईत पुन्हा दहशतीचे दिवस परतू देणार नाही; एकनाथ शिंदेंचा इशारा

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणाची गंभीर दखल; आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके तैनात नागपूर: मुंबईत पुन्हा दहशतीचे…

2 तास ago

शिक्रापूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; दोन महिन्यांत ६७ वाहने मालकांना परत

३७ लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तांतरित; वाहनमालकांना दिवाळीची भेट  शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): गुन्हे, अपघात तसेच…

3 तास ago

दात आणि तोंड यांची निगा कशी राखावी

दातांचे आजार आणि त्यांच्या उपायांबद्दल बोलायचं झाल्यास, मुख्यत्वे दात किडणे (cavities) आणि हिरड्यांचे आजार (gum…

3 तास ago

इम्यूनिटी बुस्ट करण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींपासून तयार करा काढा

पावसाळ्यात पावसामुळे निसर्ग मस्त हिरवेगार बनते, त्यासोबतच उन्हाळ्यानंतर आपल्याला मानसिक शांतीही मिळते. पण त्याचबरोबर पावसाळ्यात…

1 दिवस ago