महाराष्ट्र

मुंबईत पुन्हा दहशतीचे दिवस परतू देणार नाही; एकनाथ शिंदेंचा इशारा

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणाची गंभीर दखल; आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके तैनात

नागपूर: मुंबईत पुन्हा दहशतीचे दिवस परतू देणार नाही, असा ठाम इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टायगर श्रॉफ यांच्यावरील गोळीबाराच्या घटनेनंतर दिला. सेलिब्रिटी असो किंवा सामान्य नागरिक, प्रत्येकाच्या सुरक्षेची जबाबदारी सरकार आणि पोलिसांची आहे. मुंबईत दादागिरी, दहशत किंवा कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले की, टायगर श्रॉफ यांच्यावरील गोळीबाराची घटना अत्यंत चिंताजनक आणि निंदनीय आहे. या प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांशी चर्चा करण्यात आली असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. गोळीबार करणाऱ्यांना लवकरात लवकर शोधून काढून कायद्याच्या चौकटीत कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

या घटनेनंतर शिंदे यांनी टायगर श्रॉफ तसेच त्यांचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्याशी संवाद साधला. चिंता करू नका, सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असा विश्वास त्यांनी दोघांनाही दिला.

मुंबईने नव्वदच्या दशकात गँगवॉरचा गंभीर काळ अनुभवला आहे. त्यावेळी मुंबई पोलिसांनी कठोर कारवाई करत गँगवॉरवर नियंत्रण मिळवले आणि शहरातील कायदा-सुव्यवस्था पूर्वपदावर आणली. आता पुन्हा कोणी मुंबईत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याला कठोरपणे रोखले जाईल, असा इशाराही शिंदे यांनी दिला.

मुंबई सुरक्षित ठेवणे आणि नागरिकांच्या मनातील सुरक्षिततेची भावना कायम राखणे ही सरकारची प्राथमिकता आहे. कोणतीही गँग असो किंवा कोणतीही व्यक्ती, दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सरकार आणि मुंबई पोलीस सोडणार नाहीत, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

सेलिब्रिटींच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल; मात्र सुरक्षा ही केवळ प्रसिद्ध व्यक्तींपुरती मर्यादित नसून मुंबईतील प्रत्येक नागरिकाचा तो हक्क आहे. धमकी, दहशत किंवा दादागिरीच्या माध्यमातून नागरिकांना घाबरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध पोलीस कठोर कारवाई करतील, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना समर्पित शिवसेनेचा दसरा मेळावा; मदतीसाठी राज्यव्यापी कार्यक्रमाची घोषणा होणार

मुंबई: राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने यंदाचा दसरा मेळावा संकटग्रस्त शेतकऱ्यांना समर्पित केला आहे. गोरेगाव येथील…

1 तास ago

दुष्काळग्रस्त गावांसाठी स्वतंत्र सूक्ष्म कृती आराखडे तयार करा

धाराशिव जिल्ह्यातील पाणी, चारा टंचाईवर उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचे डॉ. राजेश देशमुख यांचे निर्देश धाराशिव: जिल्ह्यातील…

1 तास ago

टायगर श्रॉफच्या भेटीसाठी एकनाथ शिंदे वांद्र्यात; कलाकारांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचे निर्देश

मुंबई: बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर आज संध्याकाळी अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याची घटना घडली. या…

2 तास ago

शिक्रापूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; दोन महिन्यांत ६७ वाहने मालकांना परत

३७ लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तांतरित; वाहनमालकांना दिवाळीची भेट  शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): गुन्हे, अपघात तसेच…

3 तास ago

दात आणि तोंड यांची निगा कशी राखावी

दातांचे आजार आणि त्यांच्या उपायांबद्दल बोलायचं झाल्यास, मुख्यत्वे दात किडणे (cavities) आणि हिरड्यांचे आजार (gum…

3 तास ago

इम्यूनिटी बुस्ट करण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींपासून तयार करा काढा

पावसाळ्यात पावसामुळे निसर्ग मस्त हिरवेगार बनते, त्यासोबतच उन्हाळ्यानंतर आपल्याला मानसिक शांतीही मिळते. पण त्याचबरोबर पावसाळ्यात…

1 दिवस ago