कोल्हापूर मनपातील 25 माजी नगरसेवकांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश
मुंबई: कोल्हापूर महानगरपालिकेतील 25 माजी नगरसेवक आणि काँग्रेसच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. यात कोल्हापूर मनपामधील तीन माजी महापौरांचाही समावेश आहे. या सर्वांचे शिंदेंनी पक्षात स्वागत करून आगामी मनपा निवडणुकांच्या रणांगणात पक्षाच्या वतीने शड्डू ठोकला आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या मुक्तागिरी या शासकीय निवासस्थानी पार पडलेल्या या पक्षप्रवेशावेळी कोल्हापूर मनपाचे माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी महापौर प्रतिभा नाईकनवरे, माजी महापौर सुनील कदम, माजी उपमहापौर दिगंबर फराकटे, माजी स्थायी समिती सभापती संभाजी जाधव, माजी सभापती अभिजित चव्हाण, माजी शिक्षण समिती सभापती रशीद बारगीर, माजी नगरसेविका रीना कांबळे, पूजा नाईकनवरे, अश्विनी बारामते, गीता गुरव, अनुराधा खेडेकर अर्चना राजू पागर, सीमा कदम, कविता माने, सुनंदा मोहिते,संगीता सावंत, प्रकाश नाईकनवरे, जहांगीर पंडत, भरत लोखंडे, आनंद खेडकर, इस्माईक बागवान आणि त्यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. त्यासोबत काँग्रेस पक्षातील अभिजित खतकर, युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष किरण पाटील, जिल्हा सचिव कुलदीप सावरतकर, संजय सावंत,पार्थ मुंडे, अशोक इंगळे, सुजल चव्हाण यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.
यावेळी बोलताना शिंदे यांनी, कोल्हापूर जिल्ह्यातील सगळे प्रमुख नगरसेवक आज शिवसेनेमध्ये आले आहेत ही आनंदाची बाब आहे. विधानसभा निवडणुकीत याच कोल्हापूरातून आम्ही महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ केला होता . आणि पाच आमदारांच्या रूपाने येथील जनतेने आम्हाला भरभरून मतांचे दान दिले. गेल्या अडीच वर्षात विविध विकासकामांसाठी आम्ही 4 हजार 200 कोटी रुपयांचा निधी या शहराला दिला. त्यातून शहरात अनेक विकासकामे घडली. पुराच्या काळात मी कोल्हापूरात मदतीसाठी आलो होतो मात्र आपल्याला आता या शहराला पुराच्या विळख्यातून कायमचे सोडवायचे आहे. आता पुन्हा एकदा कोल्हापूरचा विकास करण्यासाठी आपल्याला एकत्र येऊन पालिकेवर भगवा फडकवाय चा असून त्यासाठी सर्वांनी कामाला लागावे असे आवाहन यावेळी शिंदे यांनी केले.
यावेळी आरोग्य आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश अबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार किशोर अप्पा पाटील, माजी आमदार जयश्री जाधव, शिवसेनेचे कोल्हापूर संपर्कप्रमुख उदय सावंत, आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
पाचोरा विधानसभेतील असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश
यासोबतच पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या पुढाकाराने अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. यात बंडू माने, सचिन मिस्त्री, अमोल मिस्त्री, किशोर सुतार, दंगल भोई, राकेश सुतार, शाळीग्राम सुतार, प्रवीण सुतार आणि त्यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…