महाराष्ट्र

एकनाथ शिंदेचा सर्वसमावेशक अ‍ॅक्शन प्लॅन जाहीर; ‘ड्रग्स-फ्री ते वर्ल्ड क्लास मुंबई’चा संकल्प

मुंबई: मुंबईला ड्रग्स-फ्री, झोपडपट्टीमुक्त आणि अतिक्रमणमुक्त करून जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी राज्य सरकारने व्यापक अ‍ॅक्शन प्लॅन जाहीर केला आहे. प्रत्येक महापालिका रुग्णालयात डी-अ‍ॅडिक्शन सेंटर सुरू करण्यापासून झोपडपट्टी पुनर्विकास, प्रदूषण नियंत्रण आणि पायाभूत सुविधा बळकटीकरणापर्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मुंबई शहर जिल्हा नियोजन समिती (DPDC) बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विकासकामांमध्ये पक्षीय राजकारण न आणता लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या प्रश्नांना न्याय देणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

झोपडपट्टी पुनर्विकास आणि गृहनिर्माणाला गती

एसआरए प्रकल्पांना वेग देत रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे ४० लाख घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे शिंदे यांनी सांगितले. रमाबाई आंबेडकरनगर येथील १७ हजार घरांच्या प्रकल्पाला एमएमआरडीएकडून चालना देण्यात आली असून धोकादायक इमारती व क्लस्टर पुनर्विकासालाही गती दिली जाणार आहे.

पावसाळ्यापूर्व तयारीवर भर

पावसाळ्यापूर्वी रस्ते, नालेसफाई आणि पूरनियंत्रणाची कामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यातील काँक्रीट रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून दुसरा टप्पा सुमारे ९० टक्के पूर्ण झाला आहे. तिसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. पाणी साचणाऱ्या ठिकाणी यंत्रणा बसवणे आणि होल्डिंग पाँड कार्यान्वित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.

अतिक्रमण हटाव आणि वाहतूक सुधारणा

फुटपाथ अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. पादचाऱ्यांचा हक्क सुरक्षित ठेवत फेरीवाल्यांमुळे नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी संयुक्त उपाययोजना कराव्यात, तसेच रेल्वे स्थानक व बाजारपेठ परिसरात मोबाईल टॉयलेट आणि महिलांसाठी पिंक टॉयलेट उभारण्याचे आदेश देण्यात आले.

प्रदूषण नियंत्रण आणि ड्रग्स-फ्री मोहिम

बांधकामस्थळी स्प्रिंकलर, नेट व धूळ नियंत्रण उपाय अनिवार्य करण्यात येणार असून हे नियम सरकारी प्रकल्पांनाही लागू असतील. ‘ड्रग्स-फ्री मुंबई’ मोहिमेअंतर्गत प्रत्येक महापालिका रुग्णालयात डी-अ‍ॅडिक्शन, समुपदेशन आणि पुनर्वसन कक्ष सुरू करण्यात येणार आहेत.

आरोग्य सेवांमध्ये सुधारणा

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत एन्जिओग्राफी, स्टेंट आणि महागड्या शस्त्रक्रियांचा समावेश करण्याचा प्रस्ताव असून सर्व सरकारी रुग्णालयांत १०० टक्के मोफत औषधे उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केईएम रुग्णालयातील तक्रारीनंतर कारवाई करण्यात आली असून सध्या सुमारे ८० टक्के रुग्णालयांत औषधे मोफत मिळत आहेत; ती पूर्णतः मोफत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

बेकायदेशीर नागरिकांविरोधात कारवाई

बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी व आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना प्रशासन आणि पोलिसांना देण्यात आल्या आहेत.निधी वाटपात कोणताही दुजाभाव न करता नागरिकांना तात्काळ दिलासा देणे ही शासनाची कार्यपद्धती असल्याचे सांगत मुंबई अतिक्रमणमुक्त, सुरक्षित आणि सर्व सुविधा असलेले ‘वर्ल्ड क्लास’ शहर बनवण्यासाठी राज्य सरकार पूर्ण सहकार्य करणार असल्याचे शिंदे यांनी नमूद केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

8 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago