महाराष्ट्र

विद्यार्थ्यांना जर्मनी आणि जपानमध्ये रोजगाराच्या संधी; राज्य तंत्रशिक्षण मंडळ–सीआयआयमध्ये सामंजस्य करार

मुंबई: विद्यार्थ्यांना विदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक असते. यासाठी जर्मनी, जपान आणि रशिया या देशांच्या भाषांचे प्रशिक्षण देण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. या भाषा प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय कामकाज संस्कृतीशी जुळवून घेण्याची क्षमता, संवाद कौशल्ये आणि व्यावसायिक आत्मविश्वास वाढेल. परिणामी, परदेशातील रोजगाराच्या संधींमध्ये लक्षणीय वाढ होईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

आज मंत्रालयात महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (MSBTE) आणि Confederation of Indian Industry (CII) यांच्यात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत एन., सीआयआयचे राज्य प्रमुख पुष्कर हाथे, तसेच सीआयआय आंतरराष्ट्रीय भाषा विभागाचे प्रमुख नवोनील डी. आणि दयाल कांगणे उपस्थित होते.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, जर्मनीसारख्या देशांमध्ये कुशल मनुष्यबळाची मोठी मागणी आहे. राज्यातील पदविका विद्यार्थ्यांना तेथे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा करार करण्यात आला आहे. या सामंजस्य करारानुसार, CII त्यांच्या कौशल्य उत्कृष्टता केंद्रामार्फत (CII CoE on Skills) “महाराष्ट्र–जर्मनी–जपान कुशल कामगार गतिशीलता” या उपक्रमासाठी अंमलबजावणी व उद्योग समन्वय भागीदार म्हणून कार्य करणार आहे. या कराराचा मुख्य भर प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि कौशल्य समन्वयावर राहणार आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून या उपक्रमासाठी आवश्यक पायाभूत सुविधा—वर्गखोल्या, प्रयोगशाळा आणि नेटवर्किंग सुविधा—उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच, धोरणात्मक देखरेख आणि प्रशिक्षण उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी समन्वय साधला जाणार आहे. हा करार राज्यातील तंत्रशिक्षण विद्यार्थ्यांसाठी जागतिक रोजगाराच्या नव्या संधींचे दालन खुले करणारा ठरेल, असा विश्वास मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कमी खाऊनही वाढतंय तुमचं वजन, या 5 सवयी ठरु शकतील जबाबदार

सध्या सर्वांना भेडसवणार एकच प्रश्न म्हणजे वजन कमीच होत नाही. अनेक जण वजन कमी करण्यासाठी…

2 तास ago

रात्रीच्या जेवणानंतर इवलिशी वेलची चावून खा! एक नाही अनेक गुणकारी फायदे

रात्रीच्या जेवणानंतर आपल्यापैकी बऱ्याचजणांना गोड पदार्थ खाण्याचे क्रेविंग्स होतात. अशावेळी या गोड पदार्थांचे क्रेविंग्स भागवण्यासाठी…

2 तास ago

SIR वादावर NDAमध्येही मतभेद? कुशवाहांचा निवडणूक आयोगाला सवाल

नवी दिल्ली : विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याभोवती सुरू…

2 तास ago

कडा हादरले! गणेश विसर्जन मिरवणुकीत १८ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला

जुन्या वादातून हल्ल्याचा संशय; छाती, पोट आणि हातावर सपासप वार, प्रकृती गंभीर; हल्लेखोरांचा शोध सुरू…

2 तास ago

मीटरवरील ‘हा’ लाल दिवा देतोय मोठा संकेत! वीजबिल वाढण्याआधीच कळू शकते कारण

मुंबई : घरातील इलेक्ट्रिक मीटर म्हणजे केवळ किती युनिट वीज वापरली याची नोंद करणारे उपकरण…

2 तास ago

विखे कुटुंबातील नीला विखे पाटील स्वीडनच्या संसदेत

काका राधाकृष्ण विखे पाटलांपासून दशकभर संपर्क नसल्याचा दावा अहिल्यानगर : अहिल्यानगरच्या विखे पाटील कुटुंबातील नीला…

3 तास ago