महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगरच्या विकास प्रकल्पांना गती; भूसंपादनासाठी ३० खासगी भूमापकांची नियुक्ती

ऑरिक, ग्रीनफील्ड रस्ता, विमानतळ विस्तार आणि रेल्वे दुहेरीकरणाच्या कामांना मिळणार वेग; नागरिकांच्या जमीन मोजणीची प्रतीक्षाही होणार कमी

मुंबई: छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरातील रखडलेल्या विकास प्रकल्पांना आता गती मिळण्याची शक्यता आहे. भूसंपादनासाठी आवश्यक असलेल्या जमीन मोजणीची कामे जलद करण्यासाठी प्रशासनाने ३० खासगी भूमापक एजन्सींची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. भूमी अभिलेख विभागाकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याने अनेक प्रकल्पांची भूसंपादन प्रक्रिया रखडली होती. खासगी भूमापकांच्या नियुक्तीमुळे ही अडचण दूर होऊन ऑरिक, एमआयडीसी, विमानतळ विस्तार, ग्रीनफील्ड रस्ता आणि रेल्वे दुहेरीकरणासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांना मोठी चालना मिळणार आहे.

ऑरिक-बिडकीन औद्योगिक क्षेत्रासाठी सुमारे ८ हजार एकर जमिनीचे भूसंपादन अपेक्षित असून, त्यासाठी जमीन मोजणीचे काम वेगाने होणार आहे. तसेच शेंद्रा-बिडकीन-ढोरेगाव या ६७.८० किलोमीटर लांबीच्या ग्रीनफील्ड रस्त्यासाठी ४६ गावांतील भूसंपादन प्रक्रियेलाही गती मिळेल.

याशिवाय विमानतळ विस्तारासाठी आवश्यक असलेल्या सुमारे ४४० हेक्टर जमिनीच्या भूसंपादन प्रक्रियेला आणि छत्रपती संभाजीनगर-परभणी दुहेरी रेल्वेमार्ग प्रकल्पालाही याचा फायदा होणार आहे.

या निर्णयाचा लाभ केवळ सरकारी प्रकल्पांनाच नव्हे, तर खासगी जमिनीच्या मोजणीसाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांनाही होणार आहे. सध्या जमीन मोजणीसाठी सुमारे दोन महिने लागणारा कालावधी आता एका महिन्यापर्यंत कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे विकासकामांसह नागरिकांच्या भूमापनाशी संबंधित कामांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

1 तास ago

पाबळ-कान्हूर-केंदूर! निवडणूक आली की पाण्याची चर्चा; टंचाई मात्र कायमच!

पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…

2 तास ago

रांजणगावमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी 12 तासात अटक LCB आणि रांजणगाव MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…

6 तास ago

शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…

11 तास ago

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

1 दिवस ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

1 दिवस ago