मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याविरोधात काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवर करण्यात आलेल्या ‘गुंगी गुडिया’ या टिप्पणीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी मुंबईतील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर मूक आंदोलन केले.
मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी हाताला काळ्या फिती बांधून आणि हातात संविधान घेऊन काँग्रेसच्या विरोधात निषेध व्यक्त केला. काँग्रेसकडून अद्याप माफी मागण्यात आलेली नसल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यापूर्वी मंगळवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घुसून आंदोलन केले होते. त्यानंतरही काँग्रेसकडून दिलगिरी व्यक्त न झाल्याने पुन्हा मूक आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात आमदार सना मलिक-शेख, महिला प्रदेशाध्यक्षा वैशाली नागवडे, ज्येष्ठ नेत्या सुरेखाताई ठाकरे, युवक प्रदेशाध्यक्ष निखिल ठाकरे, प्रदेश सरचिटणीस संतोष धुवाळी, कार्यालयीन सचिव संजय तटकरे, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, सहकार सेल अध्यक्ष नंदकुमार काटकर, ज्येष्ठ नेते बापू भुजबळ यांच्यासह पक्षाचे जिल्हाध्यक्ष, महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…
पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…
शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…