महाराष्ट्र

स्कॉर्पिओसह दोन गाड्या दिल्या तरी मन नाही भरल; ३६ लाखांच्या हुंड्यासाठी सासरच्यांनी तीला जिवंत जाळल

ग्रेटर नोएडा: लग्नानंतर आठ वर्ष हुंड्यासाठी छळ करून अखेर एका २६ वर्षीय विवाहितेची तिच्या पतीने आणि सासरच्यांनी मिळून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना ग्रेटर नोएडातील सिरसा गावात घडली आहे.

पीडितेला जिवंत जाळण्यात आले. गंभीररित्या भाजलेल्या अवस्थेत काही तास मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी तिचा पती विपिन याला अटक केली आहे, तर सासू, सासरे आणि दीर अद्याप फरार आहेत. अतिरिक्त पोलीस उपायुक्त (DCP) सुधीर कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, निक्की असे मृत महिलेचे नाव आहे. २१ ऑगस्टला तिला गंभीर भाजलेल्या अवस्थेत फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती चिंताजनक असल्याने तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात येत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. निक्कीची बहीण कांचन हिने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन बहिणी एकाच घरात, दोघींचाही छळ

२०१६ मध्ये निक्की आणि तिची बहीण कांचन या दोघींचे लग्न दोन भावांशी झाले होते. कांचनचे लग्न रोहितशी, तर निक्कीचे लग्न विपिनशी झाले होते. कांचनने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या वेळी तिच्या कुटुंबीयांनी एक स्कॉर्पिओ गाडी आणि इतर मौल्यवान वस्तू दिल्या होत्या. तरीही सासरचे लोक ३६ लाख रुपयांची मागणी करत होते. नंतर आणखी एक गाडी देण्यात आली, पण पैशांची मागणी आणि छळ थांबला नाही. कांचनने सांगितले, “ते निक्कीला रोज मारहाण करून तिचा छळ करत होते. मी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी मलाही मारहाण करायचे.

असा घडला थरार

कांचनने पुढे सांगितले की, निक्कीचा पती विपिन हा बेरोजगार होता आणि त्याला दारूचे व्यसन होते. तो अनेकदा निक्कीला मारहाण करायचा आणि त्याचे आई-वडील त्याचीच बाजू घ्यायचे. त्यांच्यातील वाद अनेकदा स्थानिक पंचायतीसमोर मांडण्यात आले होते, परंतु छळ थांबला नाही. २१ ऑगस्ट रोजी विपिनने दोन्ही बहिणींना मारहाण केली. त्यानंतर त्याने निक्कीच्या मानेवर जोरदार प्रहार केला, ज्यामुळे ती खाली कोसळली. “यानंतर त्याने तिच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून तिला पेटवून दिले,” असा गंभीर आरोप कांचनने केला आहे. छळाचे काही व्हिडिओही पोलिसांच्या हाती लागले असून, त्यात पती आणि सासू निक्कीला मारहाण करत आणि फरफटत नेत असल्याचे दिसत आहे.

रुग्णालयात मृत्यू, पतीला बेड्या

घटनेनंतर शेजारी आणि बहिणीने निक्कीला तातडीने रुग्णालयात दाखल केले, परंतु गंभीररित्या भाजल्यामुळे तिचा जीव वाचू शकला नाही. रुग्णालयाकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी पती विपिन, त्याचा भाऊ रोहित आणि त्यांचे आई-वडील दया आणि सतवीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. इतर आरोपी फरार असून, त्यांना अटक करण्यासाठी अनेक पथके तैनात करण्यात आली आहेत, असे अतिरिक्त डीसीपी कुमार यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भीमाशंकरहून परतताना शिंदेंचा ताफा थेट आंबेगावात; आढळरावांच्या घरी अचानक भेट

पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 तास ago

धनुष्यबाणावरून सुप्रीम कोर्टात मोठा ट्विस्ट; शिंदे गटाकडून ठाकरे गटाला घेरणारी कागदपत्रे सादर

मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…

2 तास ago

राहुल गांधींच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न; संघटन विस्ताराचा दिला मंत्र

नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…

2 तास ago

SIR मोहिमेवर काँग्रेस आक्रमक; दावे-हरकतींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…

4 तास ago

साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना; एफआरपी वेळेत देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…

6 तास ago

१७ सप्टेंबरला बीड–पुणे रेल्वे धावणार; डिसेंबरअखेर बीड–मुंबई सेवाही सुरू करण्याचे उद्दिष्ट

मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…

6 तास ago