महाराष्ट्र

सकल मराठा घाटकोपर जनजागृती बाईक रॅली

मुंबई: मुंबई,घाटकोपर,आज रविवार (दि. २४) ऑगस्ट २०२५ रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने घाटकोपर विभागात भव्य जनजागृती बाईक रॅली काढण्यात आली. ही रॅली भटवाडी सिद्धी गणेश मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून येथून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक,अमृतनगर सर्कल येथे संपन्न झाली.

समाजातील हजारो बंधू-भगिनी व युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत समाजाच्या ऐक्याचा आणि एकतेचा भक्कम संदेश दिला.या रॅलीचे आयोजन माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आझाद मैदान आंदोलनाच्या समर्थनार्थ करण्यात आले होते. मराठा समाजाच्या हक्काच्या लढ्यात घाटकोपर विभागातील सर्व समाजबांधव एकदिलाने सहभागी होणार असल्याचा निर्धार या रॅलीमधून व्यक्त झाला.

ही बाईक रॅली फक्त निदर्शनापुरती मर्यादित न राहता, समाजाच्या पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी व समाज जागृतीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली. रॅली दरम्यान परिसरात “एक मराठा लाख मराठा”, “जय शिवराय – जय जिजाऊ” या घोषणांनी वातावरण दणाणून गेले. भव्य बाईक रॅलीत समाजातील युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभाग. मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला घाटकोपर मराठा समाजाचा ठाम पाठिंबा.पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी व समाज एकतेसाठी हे आंदोलन महत्त्वाचे असल्याचा संदेश. घाटकोपर परिसरात समाजबांधवांनी दिला एकजुटीचा दणदणीत आवाज.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंग दुखण्याची कारणे

थंड हवा थेट अंगावर लागणे: एसी किंवा फॅनची हवा जर थेट तुमच्या शरीरावर येत असेल,…

6 तास ago

केस खूपच पातळ झाले-जराही वाढत नाही? हे ५ पदार्थ खा, विंचरताना कंटाळा येईल इतके वाढतील केस

केस नैसर्गिकरित्या काळे राहण्यासाठी आणि केस वाढवण्यासाठी खास डाएट फॉलो करणंही गरजेचं असतं. केसांना पोषण…

6 तास ago

शिक्षक दिनानिमित्त गुणवंत शिक्षकांचा सन्मान; विजय सावंत यांना लायन्स क्लब शिक्षक पुरस्कार

मुंबई : शिक्षक दिनानिमित्त अभ्युदय येथील शिवाजी विद्यालयात लायन्स क्लब ऑफ मीडटाऊनच्या वतीने मुंबईतील उपक्रमशील…

6 तास ago

गणेशभक्तांसाठी शिवसेनेची मोठी घोषणा; २९०० एसटी बसची मोफत व्यवस्था

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा,…

7 तास ago

नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीचा संभ्रम अखेर दूर; नमुना क्र. ६४ वर आता मुख्याधिकाऱ्यांचीच अंतिम सही

मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या आर्थिक व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या नमुना क्र. ६४ वर नगराध्यक्षांची…

7 तास ago

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

20 तास ago