महाराष्ट्र

तोपर्यंत मी पुण्याची निवडणूक लढण्याचा निर्णय घेणार नाही

मुंबई: आपण दुर्लक्ष केल्यामुळे आणि वरवर प्रचार केल्यामुळे आजपर्यंत जे चित्र दिसलं ते पुन्हा पाहायचं नाही. तुम्हाला पक्षाबद्दल प्रेम वाटत असेल तर गेल्या बारा वर्षात जो अपमान झाला आहे त्याचा बदला घेतला पाहिजे. गटाध्यक्ष आणि अन्य दोन लोकांची यादीनुसार नावे माझ्याकडे आली पाहिजे. अन्यथा मी पुण्याची निवडणूक लढण्याचा निर्णय घेणार नाही, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना इशारा देत स्पष्ट सांगितले आहे.

पुण्यातील सावित्रीबाई फुले स्मारक येथे शाखाध्यक्षांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला अनिल शिदोरे, अविनाश अभ्यंकर, रणजित शिरोळे, किशोर शिंदे, साईनाथ बाबर उपस्थित होते.

राज ठाकरे म्हणाले, “तुम्हाला निवडून यायचं असेल तर मतदान यादीवर काम केल्याशिवाय गत्यंतर नाही. तुमच्याकडे चार वॉर्डांचा एक प्रभाग आहे. एका वॉर्डात 16 ते 22 मतदार याद्या येतात. प्रत्येक यादीसाठी दोन माणसं ठेवायचे आहेत. आणि एक गटाध्यक्ष नेमायचा आहे. गटाध्यक्ष हा पक्षाशी संबंधित आंदोलन करणारा पाहिजे. जी दोन माणसं आहेत ती फक्त निवडणुकीसाठी पाहिजे. ती आंदोलनासाठी नको आहेत. त्या दोन माणसांनी फक्त यादीवर काम करायचा आहे. वॉर्डात 1200 माणसं राहतात त्यांच्याऐवजी कोण राहतं का? 1200 माणसांचं मतदान यादीत नाव आहे का? सतत याची पडताळणी केली पाहिजे.” दुसरं म्हणजे प्रत्येक शाखाध्यक्षांनी तुमच्याकडे असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मधून एक यादी काढायची. त्यामध्ये तुमच्या मतदार संघातील लोक असली पाहिजे. ज्यांची नाव तुम्ही काढाल त्यांच्याशी व्यक्तिगत तुम्ही चर्चा कराल. त्यांना विचारा आमचा बूथ एजंट म्हणून काम करशील का? मतदानावेळी तो तिथे हजर असला पाहिजे, असे राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले.

एकाच घरात 80 माणसं मतदार असल्याचा समोर आले आहे. मग ही परिस्थिती पुण्यात असेल तर तुम्ही कशी निवडणूक लढणार आहात? मतदार यादी कुणाला घुसवले हे तुम्हाला काय माहिती? कोणत्याही नावाने माणसं मतदार यादीत घुसवली आहेत. ती तुम्हाला आत्तापासून तपासता नाही आली तर तुम्ही निवडणुकीला काय म्हणून सामोरे जाणार आहात? मग आपण काय म्हणून निवडणुका लढवायच्या? निवडणूक लढवायची असेल तर पहिल्यांदा मी सांगितलेलं काम करावे लागेल, असे राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. गटाध्यक्ष आणि अन्य दोन माणसं, अशी एकूण तीन लोकांची यादीनुसार नावे मला आली पाहिजे. तोपर्यंत मी पुण्याची निवडणूक लढण्याचा निर्णय घेणार नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

11 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 दिवस ago