महाराष्ट्र

राजकारणात खळबळ! राष्ट्रवादीचे 2 नाही तर 3 गट?

मुंबई: राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार अशी चर्चा रंगली असताना रोहित पवार यांच्या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी दादांच्या राष्ट्रवादीसंदर्भात एक मोठा दावा केला आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे 3 गट सक्रिय असल्याची चर्चा रोहित पवार यांच्या दाव्यामुळे रंगली आहे.

राष्ट्रवादी पक्षात फूट पडली आणि राष्ट्रावादीचे दोन गट झाले. शरद पवारांची राष्ट्रावादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा गट राज्याच्या सत्तेत सहभागी झाला. तर, शरद पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. आता मात्र, राज्यात राष्ट्रवादीचे 2 नाही तर 3 गट असल्याची चर्चा रंगली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी याबाबत खळबळजनक दावा केला आहे.

दादांच्या राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाले आहेत असं विधान रोहित पवार यांनी केले आहे. अजित पवारांवर आरोप झाल्यास पक्षातील किती प्रमुख नेते दादांची बाजू घेतात? असा सवाल रोहित यांनी उपस्थित केला. अजित पवारांच्या राष्ट्रावादीतील कोकणातील नेते स्वत:ला बॉस समजतात असं म्हणत रोहित पवार यांनी सुनिल तटकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. तर दुसरीकडे तटकरेंवर पत्ते फेकल्यावर काहीजण मारहाण करतात असं म्हणत रोहित पवारांनी राष्ट्रवादीतील गटबाजीवर भाष्य केले.

रोहित पवारांनी राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत मोठं विधान केले. येत्या काही महिन्यात धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरेंना तर घड्याळ हे चिन्ह शरद पवारांना मिळणार असल्याचा मोठा दावा त्यांनी केलाय. तसंच एकनाथ शिंदे आणि अजित पवार त्यांचे पक्ष भाजपात विलीन करणार असल्याचा दावा देखील रोहित पवारांकडून करण्यात आलाय. शिंदेंच्या घरी आयकर विभागाची नोटीस पाठवण्यात आल्याचा आरोप देखील रोहित पवारांकडून करण्यात आला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

5 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

5 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

5 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

5 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

6 तास ago

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

11 तास ago