महाराष्ट्र

फडणवीसांना राहुल गांधींवर टीका करण्याचा आजारच जडला! हर्षवर्धन सपकाळ

निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देतात? आयोगाचे प्रवक्ते आहेत का?; शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर उत्तर देण्याचे काँग्रेसचे आव्हान

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राहुल गांधींवर टीका करण्याचा जणू काही आजारच जडला आहे. निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत काँग्रेसने उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देत आहेत? ते निवडणूक आयोगाचे प्रवक्ते आहेत का? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

राहुल गांधी यांनी मतदार याद्या आणि निवडणूक प्रक्रियेबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे निवडणूक व्यवस्थेतील पारदर्शकतेचा मुद्दा चर्चेत आला आहे. दोन निवडणूक आयुक्तांनी लेखी स्वरूपात उपस्थित केलेल्या आक्षेपांमुळे मतचोरीच्या आरोपांना बळ मिळाले असल्याचा दावा सपकाळ यांनी केला. या प्रश्नांना तथ्यांच्या आधारे उत्तर देण्याऐवजी भाजपचे नेते राहुल गांधी यांच्यावर वैयक्तिक टीका करण्यात व्यस्त असल्याचेही त्यांनी म्हटले.

“फडणवीसांना प्रत्येक प्रश्नात राहुल गांधीच दिसतात”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात अवघ्या पाच महिन्यांत आठ टक्के मतदार वाढल्याचा मुद्दा राहुल गांधी यांनी उपस्थित केला होता. त्यामुळेच फडणवीसांनी राहुल गांधींचा धसका घेतल्याची टीका सपकाळ यांनी केली.“मुघलांच्या घोड्यांना पाण्यातही संताजी-धनाजी दिसत होते, अशी अवस्था फडणवीसांची झाली आहे. त्यांना आता प्रत्येक प्रश्नात राहुल गांधीच दिसतात,” असा टोला सपकाळ यांनी लगावला.

राज्यातील शेतकरी, बेरोजगार तरुण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर ठोस उत्तरे देण्याऐवजी राहुल गांधींवर टीका करणे हाच सरकारचा जणू एकमेव कार्यक्रम झाला आहे, असा आरोपही त्यांनी केला.

“निवडणूक आयोगाने प्रश्नांची उत्तरे द्यावीत”

निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित झाले असतील तर त्याची उत्तरे आयोगानेच द्यावीत. मुख्यमंत्र्यांनी आयोगाची बाजू मांडण्यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नांना उत्तरे देणे अधिक महत्त्वाचे आहे, असे सपकाळ म्हणाले.राहुल गांधी यांच्या मेंदूची चिंता करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या डोक्यावरचे कर्ज, उद्ध्वस्त झालेली पिके आणि त्यांच्या कुटुंबांवर आलेले आर्थिक संकट दूर करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, असेही त्यांनी म्हटले.

“मदत कधी मिळणार, हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे”

दुष्काळग्रस्त जनतेला आर्थिक मदत कधी मिळणार, चारा छावण्या कधी सुरू होणार आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात मदत कधी जमा होणार, याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे, अशी मागणी सपकाळ यांनी केली.

“हे प्रश्न सोडवणे जमत नसेल तर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन पूर्णवेळ निवडणूक आयोगाचे प्रवक्ते म्हणून काम करावे,” असा घणाघाती टोला हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुका दुष्काळाच्या छायेत असताना घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे शेतकरी चिंताग्रस्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…

11 तास ago

पुणे जिल्हा बँकेसाठी शिरुरमध्ये शिवसेनेची मोर्चेबांधणी; जिल्हाप्रमुख बाप्पुसाहेब शिंदे यांचे नाव चर्चेत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…

12 तास ago

संतुलित आरोग्यासाठी मेडिटेशन करण्याचे फायदे

आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी अनेकदा डॉक्टर मेडिटेशन करण्याचा सल्ला देतात. मेडिटेशन हे केवळ मानसिक नव्हे तर…

15 तास ago

जिमला जायला वेळ नाही? बेली फॅट कमी करण्यासाठी फॉलो करा या सोप्या गोष्टी

पोटावर वाढलेली चरबी आपला पूर्ण लूक खराब करू शकते. हट्टी बेली फॅट कमी करण्यासाठी बऱ्याच…

15 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या लग्नासाठी शिवसेनेचा मदतीचा हात; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची घोषणा…

15 तास ago

‘व्होट चोरी’च्या आरोपांवर संजय निरुपमांचा पलटवार; ‘पराभवानंतर निवडणूक आयोगाला लक्ष्य करणे योग्य नाही’

मुंबई: निवडणूक आयोग आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना…

15 तास ago