महाराष्ट्र

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त; सरकार मात्र कागदी घोडे नाचवतंय; हर्षवर्धन सपकाळ

गणराया, सरकारला शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची सुबुद्धी दे’; राहुल गांधींवरील फडणवीसांच्या टीकेवरही सपकाळांचा निशाणा

मुंबई: राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून शेतातील पिके जळून गेली आहेत. काही ठिकाणी उरलेली पिकेही वाया गेल्याने शेतकऱ्यांना त्यावर नांगर फिरवण्याची वेळ आली आहे. मात्र, सरकारकडून प्रत्यक्ष मदतीऐवजी केवळ कागदी प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांच्या घरात आनंदाऐवजी चिंतेचे वातावरण आहे. सरकारने शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करताना, “गणपती बाप्पा, या सरकारला शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची सुबुद्धी दे,” अशी प्रार्थना गणरायाकडे केल्याचे सपकाळ यांनी सांगितले.

सरकारकडून ‘प्रक्रिया सुरू आहे’ एवढेच सांगितले जाते. मात्र, ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट मदत जमा करण्याची गरज आहे, असे सपकाळ म्हणाले. महायुती सरकारने कुंभमेळ्यासाठी मोठी आर्थिक तरतूद केली असल्याचा आरोप करताना, शेतकऱ्यांना मदत देताना मात्र सरकारकडून चालढकल केली जात असल्याची टीकाही त्यांनी केली.

कर्जमाफीच्या मुद्द्यावरही सपकाळ यांनी सरकारवर निशाणा साधला. “कर्जमाफी केली, तीही फसवीच निघाली,” असा आरोप त्यांनी केला. दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीत अधिकारी व्हिडिओ पाहत बसतात, तर सत्ताधारी पक्षाचे खासदार काजू-बदाम खात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

“सरकारने लाजलज्जा सर्व सोडून दिली आहे. त्यांना कशाचेही गांभीर्य राहिलेले नाही. यापूर्वी विधानसभेत मोबाईलवर रम्मी खेळणारा कृषी मंत्री राज्याला लाभला होता. आता अधिकारी मोबाईलवर व्हिडिओ पाहत बसतात. यांना शेतकऱ्यांचे काही देणेघेणे राहिलेले नाही,” असा घणाघात सपकाळ यांनी केला.

राहुल गांधींची वाढती लोकप्रियता भाजपची झोप उडवणारी’

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा दावा सपकाळ यांनी केला. तरुणाई राहुल गांधी यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहत असल्याचे चित्र भारतीय जनता पक्षाची झोप उडवणारे आहे, असा दावा त्यांनी केला.

राहुल गांधी सरकारला थेट जाब विचारत असल्यामुळे भाजपा नेते त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप आणि टीका करत असल्याचे सपकाळ म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांनी स्टँडअप कॉमेडियनचे काम करावे, अशी टीका केल्याचा संदर्भ देत सपकाळ यांनी त्यांच्यावरही पलटवार केला.“फडणवीस यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांना मी ‘गेट वेल सून देवेंद्रजी’, एवढेच म्हणतो,” अशी टीका सपकाळ यांनी केली.

आरक्षणाच्या नावाखाली समाजात भांडणे लावण्याचे काम’

आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही सपकाळ यांनी भाजप सरकारवर आरोप केला. इंग्रजांनी ज्या पद्धतीने ‘तोडा आणि राज्य करा’ ही नीती अवलंबली, त्याचप्रमाणे भाजप सरकार आरक्षणाच्या नावाखाली समाजातील विविध जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

मराठा, ओबीसी, आदिवासी आणि व्हिजेएनटी समाजांमध्ये भांडणे लावली जात असल्याचे सपकाळ म्हणाले. “नाहीरे वर्गाला हात देण्याचे काम आहेरे वर्गाने करायला हवे,” असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

राज्यातील आपत्कालीन आरोग्यसेवेला मोठी चालना; १,७५६ नवीन १०८ रुग्णवाहिका सेवेत दाखल होणार; एकनाथ शिंदेंक

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रकल्पांतर्गत नवीन १,७५६ रुग्णवाहिका शासकीय सेवेत दाखल होणार…

3 मिनिटे ago

विद्यापीठांत विद्यार्थी मराठी साहित्य संमेलने; चंद्रकांत पाटील यांच्या सूचना

१००व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर आयोजन; युवा विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यावर भर मुंबई: १००व्या…

7 मिनिटे ago

दुष्काळावरून काँग्रेसचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल; अतुल लोंढेंचा सवाल

‘शेतकऱ्यांच्या ७/१२ कोरा करण्याचे आश्वासन कुठे गेले?’ मुंबई: राज्यात गंभीर कोरड्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून…

11 मिनिटे ago

ठाणे क्लस्टरचा ‘नवा चेहरा’; ६ हजार कुटुंबांना सुरक्षित घरे, २३ नागरी सुविधा आणि रोजगाराची संधी

ठाणे: ठाण्यातील क्लस्टर पुनर्विकास हा केवळ जुन्या घरांच्या जागी नवीन इमारती उभारण्याचा प्रकल्प नसून, हजारो…

18 मिनिटे ago

‘डीजे’ बंदीला सादलगावात हरताळ; पोलिस निरीक्षकांनी स्वतः ध्वनिक्षेपक बंद केला

दोन गणेश मंडळांच्या कर्णकर्कश मिरवणुकीवर नागरिकांची तक्रार; पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांची तातडीने कारवाई शिरूर…

28 मिनिटे ago

कवठे येमाईत ६० किलो गांजा जप्त; स्कॉर्पिओसह एकाला अटक

स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलिसांची संयुक्त कारवाई; ५२ वर्षीय संशयित ताब्यात शिरूर (अरुणकुमार मोटे):…

36 मिनिटे ago