महाराष्ट्र

भारत-यूके मुक्त व्यापार करारामुळे महाराष्ट्रासाठी जागतिक बाजारपेठेची दारे खुली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्यातील व्यापक आर्थिक व व्यापार करार (FTA) अंमलात आल्याने महाराष्ट्राच्या उद्योग, कृषी आणि निर्यात क्षेत्रासाठी जागतिक बाजारपेठेची नवी दारे खुली झाली आहेत. या करारामुळे राज्यात गुंतवणूक, रोजगार आणि निर्यातीला मोठी चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुंबईत आयोजित भारत-यूके व्यापक आर्थिक व व्यापार करार अंमलबजावणी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, ब्रिटिश उप उच्चायुक्त हरजिंदर कांग यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, उद्योजक आणि निर्यातदार उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारत-यूके करारामुळे पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील औद्योगिक केंद्रांना मोठा लाभ होणार आहे. वाहन उद्योग, अभियांत्रिकी, औषधनिर्माण, रसायन, आयटी, फिनटेक आणि स्टार्टअप क्षेत्राला नव्या संधी उपलब्ध होतील. तसेच नाशिकची द्राक्षे, कोकणचा हापूस आंबा, डाळिंब, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ आणि सागरी उत्पादनांना ब्रिटनमध्ये मोठी बाजारपेठ मिळेल.

सध्या भारत-यूके व्यापार ५६ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतका असून, २०३० पर्यंत तो दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आहे. या करारामुळे भारताच्या बहुतांश निर्यातीला शुल्कमुक्त प्रवेश मिळणार असून सेवा, गुंतवणूक आणि नवोन्मेष क्षेत्रालाही मोठी चालना मिळणार आहे.

राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले की, हा करार कृषी, अन्न प्रक्रिया, उद्योग आणि सेवा क्षेत्रासाठी अत्यंत लाभदायी ठरणार आहे. या संधींची माहिती शेतकरी, उद्योजक आणि निर्यातदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी पणन विभाग जनजागृती आणि मार्गदर्शन करणार आहे.

ब्रिटिश उप उच्चायुक्त हरजिंदर कांग यांनी सांगितले की, या करारामुळे भारतातून यूकेला जाणाऱ्या ९९ टक्के वस्तूंवरील आणि यूकेमधून भारतात येणाऱ्या ९० टक्के वस्तूंवरील शुल्क कमी किंवा शून्य होईल. त्यामुळे दोन्ही देशांतील व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक सहकार्याला मोठी चालना मिळणार आहे.

कार्यक्रमात भारत-यूके व्यापार कराराचे प्रतीक म्हणून दोन्ही देशांदरम्यान होणाऱ्या आयात-निर्यातीच्या कार्गो बॉक्सचे अनावरण करण्यात आले. तसेच उद्योग विभागाच्या वतीने या कराराच्या संधींबाबत सविस्तर माहितीही सादर करण्यात आली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

19 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago