महाराष्ट्र

मंत्री योगेश कदमांच्या कारनाम्याची फाईल मुख्यमंत्र्यांना दिली; परब म्हणाले राजीनामा होईल.

मुंबई: गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रीच्या नावाने चालणाऱ्या बारवर एकदा नाही तर तीन वेळा पोलिसांनी छापेमारी करुन कारवाई केली आहे. या कारवाईसंबंधीचे सर्व पुरावे आणि खेड येथील वाळू उपसा प्रकरणाचे पुरावे आज मुख्यमंत्र्यांना दिले आहेत. गृहराज्य मंत्र्यांवर कारवाई करावी अशी मागणी अॅड. अनिल परब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेतील आमदार अनिल परब यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या भ्रष्टाचाराच्या पुराव्यांची फाईल अनिल परब यांनी आज मुख्यमंत्री फडणवीस यांना दिली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अनिल परब यांनी माध्यमांसोबत बातचीत केली.

शिवसेना (ठाकरे) आमदार अनिल परब म्हणाले की, कांदिवली येथील डान्सबार गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रींच्या नावे आहे. तिथे पोलिसांनी छापा टाकला होता, त्यावेळी तिथे 22 बारबाला, 22 ग्राहक आणि कर्मचारी यांना ताब्यात घेतले होते. या बारवर एकदा नाही तर तीनवेळा कारवाई झाली आहे. त्यामुळे कारवाई झाल्यानंतरही वारंवार त्याच प्रकारचा गुन्हा बारचालकांकडून घडला आहे. हा सराईतपणा झाला, असा आरोप परब यांनी केला.

गृहराज्य मंत्र्यांच्या कुटुंबियांकडून राज्यात बंदी असलेले डान्सबार चालवले जात आहेत. त्यासोबतच रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये अवैध वाळू उपसा केला जात होता, असाही आरोप अनिल परब यांनी केला. ते म्हणाले की, वाळू उपसा केल्यानंतर पाच ब्रास वाळू ही गरीबांच्या घरकुलाला देण्याचा कायदा आहे. मात्र ही वाळू डम्प करुन ठेवण्यात आली आहे. त्याचे सर्व व्हिडिओ पुरावे तसेच डान्सबारवरील कारवाईचे पुरावे यांची एकत्रित फाईल मुख्यमंत्र्यांना दिली असल्याचे अनिल परब यांनी माध्यमांना सांगितले.

डान्सबारसंबंधी महाराष्ट्रात काय कायदे आहेत, आणि सावली बारमध्ये त्यांची कशी पायमल्ली करण्यात आली, या सर्व कायद्यांचीही माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून दिली असल्याचे परब यांनी सांगितले. मी दिलेल्या पुराव्यांची दखल घेऊन त्यांनी गृहराज्य मंत्र्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र मुख्यमंत्री त्यांच्यावर काही कारवाई करतील असे वाटत नाही. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा राजीनामा होईल याची काही शक्यता नाही, असेही परब म्हणाले.

खेड येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योगेश कदम यांची पाठराखण केली आहे. त्यामुळे योगेश कदम यांचा राजीनामा होण्याची शक्यता कमीच असल्याची चर्चा आहे. दरम्यान, परब यांनी दर 15 दिवसांनी मुख्यमंत्र्यांना स्मरणपत्र देणार असल्याचे म्हटले.

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांचे एक शिष्टमंडळ समोवारी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या भेटीसाठी गेले होते. शिष्टमंडळाने राज्यपालांना दिलेल्या निवेदनात सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, गृह राज्यमंत्री योगेश कदम, आमदार संजय गायकवाड, आमदार गोपीचंद पडळकर, विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर या कलंकित मंत्री आणि आमदारांना बडतर्फ करावे अशी मागणी केली.

राज्याचे गृहराज्य मंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे नेते योगेश कदम यांच्या आईच्या नावाने (ज्योती रामदास कदम) मुंबईतील कांदिवली येथे सावली बारचा परवाना आहे. या रेस्टॉरंट आणि बारमध्ये डान्सबार सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी 30 मे रोजी छापा टाकला. येथे बारबाला आणि ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती. हा बार शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्या पत्नी तथा राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रींच्या नावावर असल्याची माहिती शिवसेना (ठाकरे) गटाचे आमदार अॅड. अनिल परब यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधान परिषदेत दिली. त्यानंतर योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

20 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago