महाराष्ट्र

ड्युटीवर असताना डॉक्टर झोपला, उपचाराअभावी अपघातग्रस्ताचा मृत्यू…

मेरठ: एका ३० वर्षीय व्यक्तीचा अपघात झाला, अपघातानंतर लगेचच त्याला जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर व्यक्तीला आपत्कालीन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले, पण त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याने रक्तस्त्राव होऊन त्याचा जीव गेल्याचे म्हटले जात आहे. ही घटना मेरठमध्ये घडली आहे.

मेरठच्या लाला लजपत राय मेमोरियल मेडिकल हॉस्पिटल अँड कॉलेज या रुग्णालयात ३० वर्षीय सुनील कुमार यांना अपघातानंतर उपचारांसाठी आपत्कालीन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. पण तेव्हा ड्युटीवर असलेले डॉक्टर झोपले होते. तासभरात सुनील यांना वॉर्डमध्ये ठेवण्यात आले. रक्तस्त्राव होऊन सुनील कुमार यांचा आपत्कालीन वॉर्डमध्ये मृत्यू झाला.

ड्युटीवर असलेल्या मेडिकल कॉलेजमधील ज्युनियर रेसिडेंट डॉक्टरचा एसीसमोर झोपलेला कथित व्हिडीओ समोर आला. त्यानंतर निष्काळजीपणाच्या आरोपाखाली ज्युनियर डॉक्टरला निलंबित करण्यात आले. रुग्णालय प्रशासनाने सदर व्हिडीओची दखल घेतली आहे आणि संबंधिज ज्युनियर रेसिडेंट डॉक्टर भूपेश कुमार राय यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आयसी गुप्ता यांनी दिली आहे. शोकाकुल कुटुंबाने केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

रविवारी (२८ जुलै) रात्री एका वाहनाने ३० वर्षीय सुनील कुमार यांच्या दुचाकीला कारने धडक मारली होती. सुनील यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. ड्युटीवर असलेल्या डॉक्टर झोपले होते. त्यांना जागे होण्यासाठी आम्ही बरीच वाट पाहिली. इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मदतीसाठी विनंती केली. रक्तस्त्राव होत असल्याने सुनील यांचा स्ट्रेचरवरच मृत्यू झाला, असे सुनील कुमार यांच्या नातेवाईकांनी म्हटले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

7 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

10 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

10 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

11 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

11 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

11 तास ago