महाराष्ट्र

राष्ट्रीयकृत बँकांचे खाजगीकरण करण्याचा मोदी सरकारचा डाव हाणून पाडण्याची गरज; विश्वास उटगी

राष्ट्रीयकृत बँका वाचवण्यासाठी काँग्रेसचा पुढाकार, १ ऑगस्ट रोजी टिळक भवन येथे प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत बैठक

मुंबई: इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयकरण करून सर्वसामान्य जनतेला बँकांचे दरवाजे खुले केले. या ऐतिहासिक घटनेला काल ५६ वर्ष झाली. पण आता मात्र केंद्रातील भाजपा सरकारची धोरणे राष्ट्रीयकृत बँकांच्या हिताची नाहीत. राष्ट्रीयकृत बँका भांडवलदारांच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न सुरु आहे. बँकिंग क्षेत्रातील तज्ञ, सर्वसामान्य जनता व समविचारी संघटनांनी मोदी सरकारचा हा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे. यासाठी काँग्रेसच्या पुढाकाराने प्रदेशाध्य हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपह १ ऑगस्ट रोजी दादरच्या टिळक भवन येथे एका बैठकीचे आयोजन केले आहे, अशी माहिती बँकिंग क्षेत्रातील तज्ञ विश्वास उटगी यांनी दिली आहे.

यासंदर्भातील सविस्तर माहिती देताना विश्वास उटगी म्हणाले की, बँकांचे ताळेबंद सशक्त आहेत पण भारत सरकार व रिजर्व बँक, सार्वजनिक क्षेत्रातील मेाठी बँक IDBI ची विक्री विदेशी बँकांना करीत आहे. अर्थ व्यवस्थेत बॅंकीग क्षेत्रात विदेशी भांडवलाचा प्रवेश हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे पण राष्ट्रीयकरण संपविणे ही या प्रक्रियेची सुरुवात आहे. १२ राष्ट्रीयकरण झालेल्या बॅंकांपैकी ५ बॅंकांना केंद्र सरकारच्या असेट मेानेटायझेशन पाइपलाइन मार्फत Disinvestment कार्यक्रम राबविण्यात येईल व या बॅंकांच्या खाजगीकरणाची सुरुवात होईल. यांची विक्री विदेशी भांडवलदारांना होणे हे जनतेला मान्य होणारे नाही. याला कडाडून विरेाध करणे आवश्यक आहे. बँक कामगार संघटना हे काम करीत आहेत. राजकीय पक्ष व पुरेागामी विचारांच्या संघटनांनी व्यापक भूमिका घेऊन बॅंक राष्ट्रीयकरण या संकल्पनेला सुरुवातीपासून विरोध करणारे आजच्या केंद्र सरकारमध्ये आहेत त्यामुळे बॅंकाविषयी काय कारस्थान व आंतरराष्ट्रीय भांडवलदारांशी काय साटेलेाटे आहेत हे जनतेपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे.

राष्ट्रीयकरणाने देशाचा विकास कसा करावा याचे मार्गदर्शन केले आहे. मागील १० वर्षांत मेादी सरकारने ही व्यवस्था खिळखिळी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. बॅंक राष्ट्रीयीकरण वाचविण्याचा प्रयत्न हा आता नागरिकांच्या व बॅंकांचे लाभार्थी यांची एकजुट करून मेादी सरकारचा डाव हाणून पाडता येईल. बँकातील कर्मचारी व अधिकारी आणि निवृत्त बँक कर्मचारी जर अग्रेसर असतील तर या लढयाला मेाठया चळवळीचे स्वरूप प्राप्त होईल. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या पुढाकाराने पहिली जाहीर सभा होत असून टिळक भवन येथे १ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता ही सभा होत आहे. या सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी खासदार कुमार केतकर, विश्वास उटगी, संजीव चांदोरकर यांच्यासह बँकिंग क्षेत्रातील लोक उपस्थित राहणार आहेत, असेही विश्वास उटगी यांनी सांगितले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago