मुंबई: गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेशी संबंधित गंभीर बाब औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभेत उपस्थित करत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रुग्णवाहिकांच्या गैरव्यवहाराची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली.
गडचिरोली जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या अखत्यारीतील पाच रुग्णवाहिका सर्व्हिसिंगसाठी चंद्रपूर येथील शोरूममध्ये देण्यात आल्या होत्या. यापैकी दोन रुग्णवाहिका सहा महिन्यांपूर्वी, तर तीन रुग्णवाहिका तब्बल दोन वर्षांपूर्वी दुरुस्तीसाठी पाठविण्यात आल्या होत्या. मात्र, अद्याप त्या दुरुस्त होऊन परत मिळालेल्या नसल्याचा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला.
दुरुस्तीसाठी गेलेल्या रुग्णवाहिकांचे इंजिन, गिअरबॉक्ससह अन्य महत्त्वाचे सुटे भाग गायब झाल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. हे साहित्य कसे गायब झाले, यामागे कोणाचा हात आहे, याची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच रुग्णवाहिकांच्या देखभालीसाठी नियुक्त अभियंत्यांनी संबंधित शोरूमकडे दुरुस्तीबाबत विचारणा केल्यानंतर त्यांना धमकावण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला.
गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि आदिवासीबहुल जिल्ह्यात आधीच रुग्णवाहिकांची कमतरता असताना पाच रुग्णवाहिका दीर्घकाळ बंद अवस्थेत पडून राहणे अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी असल्याचे वडेट्टीवार यांनी नमूद केले. या प्रकरणात संगनमताने वाहनांचे साहित्य विकण्यात आले का, याचाही तपास करण्याची मागणी त्यांनी केली.
यावर उत्तर देताना आरोग्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित रुग्णवाहिका तातडीने कार्यान्वित करण्याचे तसेच एवढा कालावधी उलटूनही त्या दुरुस्त का झाल्या नाहीत, याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन विधानसभेत दिले.गडचिरोलीतील रुग्णवाहिकांच्या गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा सभागृहात केली.
मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…
मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…
बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…
निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देतात? आयोगाचे प्रवक्ते आहेत का?; शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर उत्तर…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…