मुख्य बातम्या

पुणे जिल्हा बँकेसाठी शिरुरमध्ये शिवसेनेची मोर्चेबांधणी; जिल्हाप्रमुख बाप्पुसाहेब शिंदे यांचे नाव चर्चेत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. बँकेच्या २०२६-२७ ते २०३१-३२ या कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडणूक होणार असून, सदस्य संस्थांच्या प्रतिनिधी निवडीची प्रक्रिया सुरु झाली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीचे पडघम वाजू लागले असल्याने सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणे नव्याने जुळविण्यास सुरुवात झाली आहे. 

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी सदस्य संस्थांच्या प्रतिनिधींचे ठराव मागविण्याची प्रक्रिया ऑगस्टपासून सुरु झाली असून, सप्टेंबरमध्ये अनेक तालुक्यांत प्रतिनिधी निवडीची प्रक्रिया पुर्ण झाली आहे. त्यामुळे आता इच्छुक उमेदवारांकडून मतदारसंघनिहाय मोर्चेबांधणीला वेग आला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात शिवसेनेकडुन जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सक्रिय भुमिका घेण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. याच पार्श्वभुमीवर उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी पुणे जिल्ह्यातील पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला लागण्याच्या सूचना दिल्याची माहिती पुढे येत आहे. 

शिवसेनेच्या या मोर्चेबांधणीमध्ये शिरुर तालुक्यालाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तालुक्यातील सहकारी संस्था, विविध कार्यकारी सेवा सोसायट्या, कृषी क्षेत्राशी संबंधित संस्था आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्याशी संपर्क वाढविण्याच्या हालचाली सुरु झाल्याची चर्चा आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रतिनिधींची भुमिका महत्त्वाची असल्याने प्रत्येक मतदारसंस्थेपर्यंत पोहोचण्यावर राजकीय पक्षांचा भर राहणार आहे.

बाप्पुसाहेब शिंदे यांच्या नावाची चर्चा…

शिरुरसह पुणे जिल्ह्यात शिवसेना संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरु असताना शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख बाप्पुसाहेब शिंदे यांचे नाव उमेदवारीसाठी चर्चेत आहे. दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर विविध पक्ष आणि गटांकडून सोसायट्यांच्या प्रतिनिधी निवडीसाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. काही ठिकाणी ठराव आपल्या बाजूने करण्यासाठी इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघातील स्थानिक राजकीय ताकद, सहकारी संस्थांवरील प्रभाव आणि प्रतिनिधींचे गणित याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

विशेष म्हणजे, जिल्हा बँकेची निवडणूक ही केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित न राहता जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांच्या संघटनात्मक ताकदीचीही चाचणी मानली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि महायुतीतील इतर घटक पक्षांकडूनही विविध मतदारसंघांत तयारी सुरु असल्याचे वृत्त आहे.

त्यामुळे शिरुर तालुक्यात शिवसेना गटाकडून कोणाला उमेदवारी मिळणार, बाप्पुसाहेब शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार का…? आणि स्थानिक सहकार क्षेत्रातील समीकरणे कोणत्या दिशेने वळणार, याकडे आता राजकीय वर्तुळासह सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुक्यात जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी तिघेजण इच्छुक

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुका दुष्काळाच्या छायेत असताना घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे शेतकरी चिंताग्रस्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…

15 मिनिटे ago

संतुलित आरोग्यासाठी मेडिटेशन करण्याचे फायदे

आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी अनेकदा डॉक्टर मेडिटेशन करण्याचा सल्ला देतात. मेडिटेशन हे केवळ मानसिक नव्हे तर…

4 तास ago

जिमला जायला वेळ नाही? बेली फॅट कमी करण्यासाठी फॉलो करा या सोप्या गोष्टी

पोटावर वाढलेली चरबी आपला पूर्ण लूक खराब करू शकते. हट्टी बेली फॅट कमी करण्यासाठी बऱ्याच…

4 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या लग्नासाठी शिवसेनेचा मदतीचा हात; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची घोषणा…

5 तास ago

‘व्होट चोरी’च्या आरोपांवर संजय निरुपमांचा पलटवार; ‘पराभवानंतर निवडणूक आयोगाला लक्ष्य करणे योग्य नाही’

मुंबई: निवडणूक आयोग आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना…

5 तास ago

‘निवडणूक आयोगाच्या कामकाजाची सखोल चौकशी करा’; पृथ्वीराज चव्हाण

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.…

6 तास ago